KBC 13: बिग बींशी बोलता बोलता जॉन अब्राहमला रडू कोसळलं, पहा व्हिडिओ

जॉनचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल

action hero jon abraham gets emotional on kbc 13 in front of amitabh bachchan
KBC 13: बिग बींशी बोलता बोलता जॉन अब्राहमला रडू कोसळलं, पहा व्हिडिओ

कौन बनेगा करोडपती १३ च्या मंचावर दर शुक्रवारी नवे पाहुणे येत असतात. येत्या शुक्रवारी केबीसीच्या मंचावर एँक्शन हिरो जॉन अब्राहम हजेरी लावणार आहे. जॉन सध्या त्याच्या सत्यमेव जयते २ या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. सत्यमेव जयते २च्या प्रमोशनासाठी जॉन केबीच्या मंचावर येणार आहे. जॉन सोबतच अभिनेत्री दिव्या खोसला कुमार देखील उपस्थित राहणार आहे. मस्ती आणि मनोरंजानाने भरलेला हा एपिसोड प्रेक्षकांना पाहता येणार आहे. या एपिसोडचा एक प्रोमो रिलीज झाला आहे. ज्यात जॉन अब्राहम बिग बींच्या पुढ्यात ढसाढसा रडताना दिसत आहे. जॉनचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

प्रोमोमध्ये जॉन अब्राहम आणि दिव्या खोसला कुमार बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत एंट्री करतात. बिग बी दोघांसोबत खूप मजा मस्ती करताना दिसत आहेत. जॉन फुटबॉल आपल्या एका बोटावर फिरवताना दिसत आहे. तर जॉन प्रेक्षकांना त्याचे सिक्स पॅक्सही दाखवताना दिसत आहे. त्यावर प्रेक्षकांनी जॉनच टाळ्यांच्या गजरात कौतुक देखील केले आहे.

मजा मस्ती करणारा जॉन अचानक बिग बींशी बोलत असताना अचानक भावूक होतो त्याचे डोळे पाणवतात आणि बिग बींच्या पुढ्यात ढसाढसा रडतो. रफ अँड टफ अभिनेत्याला पाहून अभिनेत्री दिव्या देखील रडू लागले. आता जॉनला कोणत्या कारणामुळे रडू कोसळले असा प्रश्न सर्वांना पडला असेल तर याचे उत्तर शुक्रवारी रात्री ९ वाजता पाहता येणार आहे.

कौन बनेगा करोडपतीच्या मंचावर आजवर अनेक दिग्गज कलाकार येऊन गेले. प्रत्येक कलाकाराला बिग बींनी बोलते केले आहे. अनेकांनी आजवर बिग बींच्या पुढ्यात अनेक चांगल्या वाईट गोष्टी शेअर केल्या आहेत.


हेही वाचा – Bigg Boss 15: बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड एंट्री केलेला अभिजीत बिचुकले कोरोना पॉझिटिव्ह