अभिषेक बच्चनच्या आगामी चित्रपटाचं बिगुल वाजलं!

‘द बिग बुल’ची पटकथा १९९० ते २००० दरम्यान भारतात होणाऱ्या आर्थिक घडामोडींवर आधारित आहे.

abhishek bachchan

गेल्या वर्षी आलेल्या ‘मनमर्जीया’ या चित्रपटानंतर अभिषेक बच्चन चित्रपटांपासून लांब होता. आता लवकरच तो कूकी गुलाटी यांचे दिग्दर्शन असणाऱ्या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचं नाव ‘द बिग बुल’ असं आहे. या चित्रपटाची निर्मीती अजय देवगण करत आहे. अजय देवगन आणि अभिषेक बच्चन यांनी याआधी २०१२ साली प्रदर्शीत झालेल्या बोल बच्चन या चित्रपटात एकत्र काम केले होते. हा एक विनोदी चित्रपट होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहीत शेट्टी याने केले होते.

अभिषेकने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हीडीओ शेअर केला आहे. त्यामुळे अभिषेक पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसणार म्हटल्यावर अभिषेकचे चाहते खूष आहेत.
“एका नवीन प्रवासाला सुरुवात करत आहे. मला तुमच्या शुभेच्छांची गरज आहे.” अशी पोस्ट अभिषेकने शेअर केली आहे. अभिषेकच्या या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या चित्रपटात अभिषेकबरोबर अभिनेत्री इलियाना डिक्रूज देखील दिसणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे.

काय आहे चित्रपटाची कथा
‘द बिग बुल’ची पटकथा १९९० ते २००० दरम्यान भारतात होणाऱ्या आर्थिक घडामोडींवर आधारित आहे. ‘द बिग बुल’ या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा अभिषेक व अजय देवगन एकत्र काम करताना दिसणार आहेत.