‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतून अमोल कोल्हे यांची एक्झिट?

हातातील गठबंधन सोडून हातात घड्याळ बांधल्यावर डॉ. अमोल कोल्हे निवडणूकीच्या रिंगणाक उतरले. लवकरच ते स्वराज्यरक्षक संभाजी मालिका सोडणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यांच्या या निर्णयामुळे त्यांचे फॅन्स मात्र चांगलेच नाराज होणार आहेत.

Dr Amol Kolhe
डॉ. अमोल कोल्हे

स्वराज्य रक्षक संभाजी महाराज मालिकेतील अभिनेते अमोल कोल्हे यांनी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नुकताच प्रवेश केला. त्यांचा पक्षातील प्रवेश आगामी शिरुर लोकसभा निवडणुकीत विजयाची नांदी ठरणार असून राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिरुरमधून ते संभाव्य उमेदवार म्हणून दावेदार मानले जात आहेत. मात्र संभाजी मालिकेचे फॅन्समात्र आता चांगलेच नाराज होणार आहेत. कारण लवकरच मालिका विश्वातून काही काळासाठी निवृत्ती घेणार असल्याची घोषणा मालेगावमध्ये डॉ. अमोल कोल्हे यांनी केले आहे.

हातावरील शिवबंधन सोडून हातात घड्याळ बांधल्यानंतर डॉ. अमोल कोल्हे चांगलेच चर्चेत आले. बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड हे नाशिकच्या मालेगाव तालुक्ययातील कौळाने येथील भूमिपुत्र असल्याने दरवर्षी त्यांचा जन्मोत्सव साजरा केला जातो. यावेळी महाराजांची १५६ वी जयंती होती. यावेळी डॉ. अमोल कोल्हे यांना महाराजा सयाजी रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

या सत्कारावेळी डॉ.कोल्हे यांनी मालिका विश्वातून काही काळासाठी निवृत्ती घेणार असल्याची घोषणा केली. त्यांच्या अशा अचानक केलेल्या घोषणेमुळे सध्या सगळेच नाराज आहेत. पण यावेळी त्यांनी ‘स्वराज्यरक्षक’च्या धर्तीवर महाराजा सयाजीरावांच्या जीवनावर एखादी मालिका, नाटक, चित्रपट करण्याचा प्रयत्न करण्याचं आश्वासनही दिलं.

निवडणूकांसाठी घेतली मालिका विश्वातून एक्झिट

लोकसभा निवडणूकीच्या तारखा रविवारी जाहीर करण्यात आल्या. त्याच्या दुसऱ्याच दिवशी अमोल कोल्हे यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रवादीत प्रवेश घेतल्यानंतर त्यांना शिरूर मतदार संघाची उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांनी कोल्हे यांच्या नावाला अधिक पसंती मिळाल्याचंही जाहीर केलं होतं. याच पार्श्वभूमीवर डॉ. कोल्हे यांनी मालिका विश्वातून एक्झिट घेण्याचा निर्णय घेतला असल्याचं म्हटलं जात आहे.

संभाजी मालिकेला महत्त्वाच्या टप्प्यावर

सध्या संभाजी मालिका प्रेक्षकांची सर्वाधिक पसंतीची मालिका आहे. संभाजी राजांवर आधारीत या मालिकेमध्ये संभाजी राजांच्या लढाया, त्यांनी घेतलेले निर्णय, स्वराज्यासाठी घेतलेली मेहनत अशा आजपर्यंत सामान्य प्रेक्षकांना माहित नसणाऱ्या गोष्टी बघायला मिळत आहेत. नुकतचं मालिकेत संभाजीराजांनी बुरहाणपूर लुटूलं आहे. लवकरच महारांजांचा राज्याभिषेक सोहळाही पार पाडणार आहे. मालिकेत इतक्या महत्त्वाच्या टप्प्यावर असताना डॉ. अमोल कोल्हे मालिकेतून एक्झिट घेणार का? हे येणारा काळच ठरवेल.