Friday, May 7, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी घाबरु नका, 'आएगा तो मोदीही' म्हणणाऱ्या 'भक्त अभिनेत्या'ला नेटकऱ्यांनी केले ट्रोल

घाबरु नका, ‘आएगा तो मोदीही’ म्हणणाऱ्या ‘भक्त अभिनेत्या’ला नेटकऱ्यांनी केले ट्रोल

अनुपम खेर यांच्यावर मिम्सचा पाऊस

Related Story

- Advertisement -

देशात कोरोनाची गंभीर परिस्थिती पाहता मोदी सरकारवर लोकांनी टीका करायला सुरुवात केली आहे. देशात दररोज लाखांच्या घरात वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे लोक हैराण झाले आहेत. त्यामुळे थेट मोदी सरकारच्या विरोधात सोशल मीडियावर टीकांची झोड उठवली आहे. देशात प्रत्येक स्थरातून मोदींवर टीका केली जात आहे. मात्र मोदींच्या विरोधात बोलल्यास मोदी भक्त शांत कसे राहतील. अनेक युझर्स सोशल मीडियाच्या माध्यमातून मोदी विरोधात बोलत असताना त्यात अभिनेते अनुपम खेर यांनीही उडी घेतली. मोदींविरुद्ध बोलणाऱ्यांना उत्तर देताना अनुपम खेर स्वत:च जबरदस्त ट्रोल झाले आहेत. सध्या सोशल मीडियावर अनुपम खेर यांच्यावर नेटकऱ्यांनी मिम्स आणि जोक्सचा पाऊस पाडला आहे.

- Advertisement -

कोरोनाच्या वाढत्या संक्रमणावरुन अनेकांनी मोदी सरकारच्या भोंगळ कारभारावर टीका केली. त्यातील एका पत्रकाराचे ट्विट वाचून अनुपम खेर यांच्यातील मोदी भक्त जागा झाला आणि त्याला उत्तर देण्याच्या नादात स्वत: ट्रोल झाले. ‘आदरणीय, हे आता जास्त होत आहे. कोरोना संकट सर्व जगासाठी आहे. सरकारवर टिका करणे गरजेच आहे पण कोरोना संकटाला लढण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. घाबरु नका येणार तर मोदीच, जय हो’, असे ट्विट अनुपम खेर यांनी केले आणि नेटकऱ्यांनी त्यांना चांगलेच ट्रोल केले आहे.

अनुपम खेर यांनी देवाने सुदबुद्धी द्यावी, तर अनुपम खेर यांनी आपले खरे रंग दाखवले आहेत, अशी टीका करत नेटकऱ्यांनी अनुपम खेर यांना उत्तर दिले आहे.

- Advertisement -


त्याचप्रमाणे एका युझरने असे म्हटले आहे की, अनुपम खेर निर्लज्ज माणूस आहे, केसांसोबत मेंदूही हरवला आहे.

बघता बघता अनुपम खेर सोशल मीडियावर ट्रेडिंगचा विषय बनले. त्यांच्यावरील अनेक जोक्स आणि मिम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.


हेही वाचा – 93 Oscar award 2021: ऑस्कर सोहळ्यात वेशभूषाकार भानू अथय्या आणि अभिनेता इरफान खानला वाहिली आदरांजली

- Advertisement -