Coronaviurs: कोरोनाच्या लढाईत अभिनेता झाला Ambulance ड्रायव्हर, करतोय लोकांचे अंत्यसंस्कार

Actor Arjun Gowda turns ambulance driver to help needy during Covid-19 crisis
Coronaviurs: कोरोनाच्या लढाईत अभिनेता झाला Ambulance ड्रायव्हर, करतोय लोकांचे अंत्यसंस्कार

देशात कोरोनाच्या लाटेने थैमान घातले आहे. मागील दिवसांपासून ३ लाखांहून अधिक नवे कोरोनाबाधित रुग्ण दिवसाला आढळत आहे. त्यामुळे देशातील या कोरोनाच्या लढाईत अनेक जण मदतीसाठी सरसावून पुढे आले आहेत. अनेक कलाकारांनी यामध्ये पुढाकार घेतला आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत लढण्यासाठी एक अभिनेता Ambulance ड्रायव्हर झाला असून तो सध्या लोकांचे अंत्यसंस्कार करत आहे. या अभिनेत्याचं नाव अर्जुग गौडा असून तो सध्या कोणत्या भूमिकेमुळे नाहीतर त्याच्या या कोरोना काळातील कामामुळे चर्चेत आला आहे.

कन्नड अभिनेता अर्जुन गौडा ज्यांना खूप गरज आहे, अशा प्रत्येक व्यक्तीच्या मदतीला धावू जात आहे. अर्जुन गौडा ‘युवरात्न’ आणि ‘रुस्तम’ या चित्रपटांमध्ये दिसला होता. सध्या करत असलेल्या उपक्रमाचे नाव त्याने ‘प्रोजेक्ट स्माईल ट्रस्ट’ असे दिले आहे. अर्जुन खुलासा केला आहे की, ‘ज्यांना रुग्णालयात पोहोचवणे गरजेचे आहे, त्यांच्यासाठी Ambulance सेवेचा वापर करत आहे. शिवाय तो काही रुग्णांच्या अंत्यसंस्कारासाठी मदत देखील करत आहे.’

बँगलोर टाईम्ससोबत बातचित करताना अभिनेता अर्जुन गौडाने सांगितले की, ‘गेल्या काही दिवसांपासून मी रस्त्यावर उतरलो आहे आणि अशा परिस्थिती मी अनेक लोकांना अंत्यसंस्कार करण्यासाठी मदत केली आहे. प्रत्येक धर्माच्या लोकांना मदत करत आहे, त्याच्या धर्मानुसार अंत्यसंस्कार करत आहे. शहरात मी स्वतः लोकांच्या मदतीसाठी जात आहे.’

पुढे अर्जुन म्हणाला की, ‘मी एका केंगेरीमध्ये राहणाऱ्या व्यक्तीसाठी व्हाइटफिल्ड घेऊ गेलो, तिथे त्यांना दाखल केले. मी त्यांची पुढे देखील मदत करत राहीन, असा विचार केला आहे. कारण त्यांची तब्येत अजूनही ठिक नाही आहे. मला लोकांची मदत करण्याची खूप इच्छा आहे. मी थोडीफार मदत करू शकतो. शिवाय मला लोकांपर्यंत ऑक्सिजन डिलिव्हर करण्याची इच्छा आहे, याची तयारी करत आहे.’


हेही वाचा – ‘रंग दे बसंती’ फेम अभिनेत्याला भाजपच्या आयटी सेलकडून जीवे मारण्याची धमकी