घरमनोरंजनगर्लफ्रेंडला मारहाण भोवली; अरमान कोहलीवर गुन्हा दाखल

गर्लफ्रेंडला मारहाण भोवली; अरमान कोहलीवर गुन्हा दाखल

Subscribe

बॉलिवूड अभिनेता अरमान कोहली विरोधात गुन्हा दाखला करण्यात आला आहे. त्याची गर्लफ्रेंड आणि फॅशन स्टायलिस्ट निरू रंधवाला मारहाण केल्याप्रकरणी सांताक्रूझ पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीत निरू रंधवाला इजा झाली असून, तिला मुंबईतील कोकीलाबेन रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. निरू रंधवाने केलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला.

दोघेही २०१५ पासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघांमध्ये आर्थिक कारणांमुळे भांडण झाल्याचं समजते. दोघांमध्ये झालेल्या भांडणानंतर अरमान कोहलीने गर्लफ्रेंड निरू रंधवाला जोरदार मारहाण केली. त्याने तिला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्याने निरूला घरातील पायऱ्यावरून खाली ढकलून दिले. तिने असा देखील आरोप केला आहे की, कोहलीने तिच्या केसाला पकडून तिचे डोके जमिनीवर जोरजोरात आपटले. तक्रारीत निरू रंधवाने असे देखील म्हटले आहे की, मारहाणीनंतर मला रूग्णालयात घेऊन जाण्याची विनंती मी त्याला करत होते. तुझ्याविरुद्ध तक्ररा करणार नाही, असेदेखील मी त्याला सांगितले. परंतु, त्यांने माझे ऐकले नाही. तो मला शिव्या देतच होता आणि मारहाण देखील करत होता. या मारहाणीत माझ्या डोक्याला जखम झाल्यामुळे मी रूग्णालयात दाखल झाले. जखम इतकी मोठी आहे माझ्यावर आता शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

- Advertisement -

पोलिसांत तक्रार केल्यानंतर आरमान कोहलीवर ३२३, ३२६, ५०४ आणि ५०६ या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस याप्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -