Sunday, May 16, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन अभिनेता आरोह वेलणकरचे सोशल मीडिया अकाऊंट हॅक,अज्ञात हॅकर्सने दिली धमकी

अभिनेता आरोह वेलणकरचे सोशल मीडिया अकाऊंट हॅक,अज्ञात हॅकर्सने दिली धमकी

अभिनेता आरोह वेलणकर याच अकाऊंट देखील एका अज्ञात हॅकर्स ने हॅक केल आहे. यामुळे अभिनेता आरोह भलताच अडचणीत सापडला आहे.

Related Story

- Advertisement -

सोशल मीडिया हे कलाकारांच चाहत्यांशी कनेक्ट होण्यासाठीच तगड माध्यम. कोणताही चित्रपट असो,एखाद फोटोशूट असो किंवा स्वतः च्या खाजगी आयुष्यातील एखादी गोष्ट असुदे कलाकार नेहमीच चाहत्यांशी सोशल मीडिया च्या आधारे गोष्टी शेअर करतात. तसेच सोशल मीडियावर होणार्‍या ट्रोलिंगचा सामना देखील कलाकारांना करावा लागतो. पण आता अनेक इंटरनेट हाकर्स मुळे देखील कलाकरांची डोकेदुखी वाढू लागली आहे. अनेक कलाकारांचे अकाऊंट हॅक होऊ लागले आहेत. आता अभिनेता आरोह वेलणकर याच अकाऊंट देखील एका अज्ञात हॅकर्स ने हॅक केल आहे. यामुळे अभिनेता आरोह भलताच अडचणीत सापडला आहे.

- Advertisement -

आरोह ने स्वत: या घटनेबाबत एका पोस्टद्वारे माहिती दिली आहे. आरोह च फेसबुक अकाऊंट हॅक करण्यात आले आहे. तसेच त्याचा मोर्फ व्हिडिओ बनवून त्याला ब्लॅक मेल करण्यात आले. इतकेच नाही तर आरोहला फोन करून धमकीही देण्यात आली. या घटनेनंतर आरोहने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. सध्या पोलिस सबंधित हॅकर्स विरुद्ध साबर गुन्हे शाखेविभागा अंतर्गत तपास करत आहेत.
काही दिवसांपूर्वी अभिनेता स्वप्नील जोशीला सुद्धा अनोळखी व्यक्तीकडून त्याच्या खासगी अकाऊंटची माहिती मागण्यात येत होती. पण प्रसंगअवधान राखत स्वप्नील ने हॅकर्सला माहिती देण्यास नकार दिला या घटने नंतर स्वप्नीलने एक व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट केला आणि लोकांना हॅकर्स पासून सावधान राहण्याचे आवाहन केले होते.


हे हि वाचा – चित्रपट,मालिकेसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची आठवड्याला होणार कोरोना चाचणी

- Advertisement -