घरमनोरंजनटप्पू वर कोसळला दुखा:चा डोंगर,अभिनेता भव्या गांधी याच्या वडिलांचे कोरोनामुळे निधन

टप्पू वर कोसळला दुखा:चा डोंगर,अभिनेता भव्या गांधी याच्या वडिलांचे कोरोनामुळे निधन

Subscribe

अचानक त्यांचा प्रकृतीत बिघाड झाल्यामुळे शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले यामुळे त्यांचे निधन झाले

छोट्या पद्यावरील नावाजलेला अभिनेता भव्या गांधी उर्फ टप्पू याच्या वडिलांचे कोरोनामुळे निधन झाल्यामुळे भव्या गांधी वर दुखा: चा डोंगर कोसळला आहे. भव्याचे वडील अनेक दिवसांपासून कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात उपचारा करिता दाखल झाले होते. पण अचानक प्रकृतीत बिघाड झाल्यामुळे शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले यामुळे त्यांचे निधन झाले असल्याची माहिती समोर येत आहे. सोनी टीव्ही वरील प्रसिद्ध मालिका “तारक मेहता का उल्टा चश्मा” यात भव्या गांधी यांनी अनेक वर्षे टप्पू ही भूमिका साकारली होती. पण शैक्षणिक कारणामुळे त्याने मालिके मधून एक्जिट घेतली होती. इतकेच नाही तर भव्या सोशल मीडियावर कमालीचा सक्रिय असतो अनेकदा आपल्या वडिलांसोबत फोटो पोस्ट केले होते. वडिलांच्या अचानक झालेल्या निधनामुळे भव्या अत्यंत दुखी: झाला आहे. तसेच सोशल मीडियावर चाहत्यांकडून भव्याच्या वडिलांना श्रद्धांजलि वाहण्यात येत आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhavya Gandhi (@bhavyagandhi97)

- Advertisement -

भारतामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. लासीकरणाला वेग आला असला तरी लाखो कोरोनाबधितरुग्ण आपुर्‍या सोयी सुविधे अभावी दगावत आहेत. ‘घरी रहा सुरक्षित रहा’ असे सरकार वारंवार सांगत असतानासुद्धा सरकारचे नियम काही ठिकाणी पायदळी तुडवत असल्याचे दिसत आहे.

- Advertisement -

हे हि वाचा – अभिनव-श्वेता यांच्यातील वाद पुन्हा चव्हाट्यावर,श्वेताच्या आरोपाचे खंडन करत अभिनवने शेअर केला व्हिडिओ

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -