घरमनोरंजनअभिनेता सुनील ग्रोवर घेतोय टीव्हीमधून ब्रेक

अभिनेता सुनील ग्रोवर घेतोय टीव्हीमधून ब्रेक

Subscribe

सध्या दोन मोठ्या बजेटच्या चित्रपटांमध्ये अभिनय करणारा विनोदवीर सुनील ग्रोवर प्रेक्षकांना छोट्या पडद्यावर काही महिन्यांसाठी दिसणार नाही.

छोट्या पडद्यावर गुत्थी, डॉ. मशहूर गुलाटी, रिंगू भाभी सारख्या अनेक व्यक्तीरेखा साकारणारा अभिनेता सुनील ग्रोवर काही महिन्यांकरता टीव्हीपासून ब्रेक घेणार आहे. आपल्या विविध विनोदी भूमिकांमधून सुनीलने प्रेक्षकांना मनमुराद हसवले. मात्र आता हा विनोदवीर या वर्षभरात छोट्या पडद्यावर दिसणार नाही. सध्या सुनील रुपेरी पडद्यावर जास्त अॅक्टीव्ह झाला असून त्याचे दोन बिग बजेट चित्रपट चर्चेत आहेत. येत्या काही दिवसात विशाल भारद्वाज यांचा पटाखा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून सुनील ग्रोवर यामध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर सलमान खानच्या आगामी ‘भारत’ सिनेमातही सुनील भूमिका साकारणार आहे.

कपिलच्या शोमध्ये सुनील नाही 

छोट्या पडद्यावर धुमाकूळ घालणाऱ्या अभिनेता सुनील ग्रोवर याने प्रेक्षकांना खळखळून हसवले. कपिल शर्माच्या शो मध्ये सुनीलला प्रामुख्याने पसंत केले गेले. आताही विनोदवीर कपिल शर्मा त्याचा नवीन शो टीव्ही घेऊन येत आहे. यामध्ये कृष्णा अभिषेकदेखील कपिलची साथ देणार आहे. मात्र सुनील ग्रोवर या शोमध्ये नसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सुनीलने सांगितले की, पुढील वर्षातील जानेवरीपर्यंत तो ‘भारत’ या सिनेमाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र राहणार आहे. त्यामुळे छोट्या पडद्यावरील शो काही महिने करू शकणार नाही.

- Advertisement -

सलमानच्या  ‘भारत’मध्ये मोठा ब्रेक 

‘भारत’ सिनेमात सलमान खान आणि कटरीना कैफ प्रमुख भूमिका साकारणार असून दिशा पटानी, तब्बू, जॅकी श्रॉफ यांच्या भूमिका पाहायला मिळणार आहेत. ‘भारत’ हा चित्रपट साउथ कोरियाच्या ओड टु माय फादर या सिनेमाने प्रेरीत झालेला असून याचे चित्रीकरण पंजाब आणि दिल्लीसह अबु धाबी आणि स्पेनमध्ये करण्यात येणार आहे. हा मल्टिस्टारर सिनेमा २०१९ ला प्रदर्शीत होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -