घरताज्या घडामोडीड्रग्ज खरेदी केल्याप्रकरणी अभिनेता दिलीप ताहील यांचा मुलगा ध्रुवला अटक

ड्रग्ज खरेदी केल्याप्रकरणी अभिनेता दिलीप ताहील यांचा मुलगा ध्रुवला अटक

Subscribe

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपास दरम्यान बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन समोर आले. तेव्हापासून अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या (NCB) रडारावर अनेक बॉलिवूडचे कलाकार होते. तसेच मागील काही दिवसांपासून बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी एनसीबीने अनेक कलाकारांच्या घरावर छापे टाकले. आता ड्रग्ज प्रकरणी अभिनेता दिलीप ताहिल यांचा मुलगा ध्रुव दिलीप ताहिल याला वांद्रे युनिटच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या अधिकार्‍यांनी अटक केली. या गुन्ह्यांत यापूर्वी मुज्जमिल अब्दुल रेहमान शेख या ड्रग्ज पेडलरला पोलिसांनी अटक केली होती.

ध्रुव हा मुज्जमिल याच्याकडून ड्रग्ज विकत घेत असल्याचे तपासात उघडकीस आले असून याच गुन्ह्यांत त्याची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. २० एप्रिलला वांद्रे युनिटच्या अधिकार्‍यांनी एमडी ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या मुज्जमिलला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. यावेळी त्याच्या अंगझडतीत पोलिसांना ३५ ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज सापडले होते, पोलीस कोठडीत असताना त्याने तो दिलीप ताहिल यांचा मुलगा ध्रुव याच्या संपर्कात असल्याचे उघडकीस आले. त्यांच्यात अनेकदा ड्रग्जसाठी Whatsapp चॅट झाले होते.

- Advertisement -

२०१९ ते २०२१ या कालावधीत ध्रुवने मुज्जमिलकडून सहा वेळा ड्रग्ज विकत घेतले होते. या ड्रग्जचे पैसे तो त्याच्या बँक खात्यात जमा करीत होता. ड्रग्जची गरज असल्याचे तो त्याला फोन करून मागणी करीत होता. तपासात ध्रुवचा सहभाग उघडकीस आल्यानंतर त्याला या अधिकार्‍यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्याने तो मुज्जमिलला ओळखत असून त्याच्याकडून ड्रग्ज घेतल्याची कबुली दिली आहे. ड्रग्जच्या गुन्ह्यांत सिनेअभिनेत्याच्या मुलावर कारवाई झाल्याने बॉलीवूडमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.


हेही वाचा – डॉक्टरांचा अवमान प्रकरण, कॉमेडियन सुनील पाल विरोधात गुन्हा दाखल


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -