घरCORONA UPDATEदिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांच्या घरात कोरोनाचा शिरकाव!

दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांच्या घरात कोरोनाचा शिरकाव!

Subscribe

महानायक अमिताभ बच्चन यांच्यानंतर दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांच्या घरात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. दिलीप कुमार यांच्या दोन्ही भावांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचे भाऊ एहसान खान (९० वर्षे) आणि अस्लम खान (८८ वर्ष) या दोघांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे शनिवारी लीलावती रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

यावेळी त्यांची कोविड टेस्ट केली असता या दोघांचाही रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला. लीलावती रुग्णालयातील डॉ. जलील पारकर दोघांवर उपचार करत आहेत. दोघांनाही व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. दोन्ही भाऊ दिलीप कुमार यांच्यासोबत रहात नाहीत.

- Advertisement -

‘‘एहसान आणि अस्लम यांना शनिवारी रात्री उशीरा रुग्णालयात आणलं गेलं होतं. तपासात त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तसेच त्यांच्या शरिरात ऑक्सिजनची मात्रा खूप कमी आहे. दोघांनाही वेंटेलिटरवर ठेवण्यात आलं आहे.” अशी माहिती डॉ. जलील पारकर यांनी दिली.

मार्चमध्ये ट्वीट करत दिली होती माहिती

दिलीप कुमार (९७ वर्ष) यांनी मार्च मध्ये ट्विट करत आरोग्याची माहिती दिली होती. ते म्हणाले होते की, ‘मी आणि माझी पत्नी सायरा बानू(७५ वर्ष) ठीक असून आयसोलेशनध्ये आहोत. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहून आम्ही असं केलं आहे. करोनाच्या संसर्गापासून वाचण्यासाठी सायरा प्रयत्न करतेय.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी बच्चन कुटुंबियांनाही कोरोनाची लागण झाली होती. अमिताभ, अभिषेक, सून ऐश्वर्या आणि नात आराध्य या चौघांनाही कोरोनाची लागण झाली होती. आता चौघही कोरोनावर उपचार घेऊन घरी परतले आहेत. दरम्यान इतर अनेक कलाकारांनाही कोरोनाची लागण झाली होती. काहींनी कोरोनावर मात केली तर काही अद्याप उपचार घेत आहेत.


हे ही वाचा – अलर्ट! बुधवारपर्यंत ‘अशी’ असेल राज्यात पावसाची स्थिती!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -