टीव्ही अभिनेता गौरव चोप्राच्या आयुष्यात दुख:द घटना घडली आहे. काही दिवसांपूर्वी गौरवच्या आईचे निधन झाले, तर आईनंतर आता त्याच्या वडिलांनीही या जगाचा निरोप घेतला आहे. गौरवने सोशल मीडियावर या घटनेबद्दल सांगितले आहे. गौरवने लिहिले, ‘श्री स्वतंत्र चोप्रा … माझे हिरो, माझे आयडॉल, माझं प्रेरणा स्थान, मला २५ वर्ष लागली हे जाणून घ्यायली की प्रत्येक वडिल हे त्यांच्यासारखे नसतात. ते खास होते. ते नेहमीच आईची काळजी घेणारे परिपूर्ण नवरा झाले. जेव्हा आई आजारी होती तेव्हा तुम्ही तिची पूर्ण काळजी घेतली आणि जेव्हा ती आम्हाला सोडून गेली, तेव्हा तुम्ही तिला तिथे जाऊनही आधार दिलात. ‘माझी आई आम्हाला १९ तारखेला आणि वडिलांना २९ तारखेला सोडून गेले. १० दिवसात ते दोघेही निघून गेले आणि मी एकटा पडलो.
गौरवने आईचे काही फोटो शेअर केली आहेत आणि लिहिले की, ‘माझी आई सर्वात शक्तिशाली आहे. पहिला फोटो वर्षभराचा आहे. तीन वर्षे तीने कर्करोगा विरोधात लढाई दिली. तीन वर्ष केमो थेरपी सुरू होती. ती एक अशी स्त्री होती ज्यांना कोणीही कमी लेखू शकत नव्हतं. प्रत्यकजण तीच्यावर प्रेम करत होता.
गौरवने उतरण, संजीवनी, अघोरी, पिया का घर, नच बलिये 2 यासह अनेक टीव्ही शोमध्ये काम केले आहे. गौरव बिग बॉस १० मध्ये देखील दिसला होता.