घरमनोरंजनहृतिक-दीपिका साकारणार ‘राम-सीता’?

हृतिक-दीपिका साकारणार ‘राम-सीता’?

Subscribe

'रामायण' हा चित्रपट हिंदी, तेलुगू आणि तामिळ या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. तसेच या चित्रपटाचे बजेट हे ५०० कोटी रुपयांचं आहे.

सध्या बॉलिवूडमध्ये सुपरहिट चित्रपटांची रांगचरांग लागली आहे. त्यात आता ‘रामायण’ चित्रपटाची भर पडणार आहे. छोट्या पडद्यावर पौराणिक कथा असलेल्या मालिकेना खुप प्रतिसाद मिळतो. याच दृष्टिकोनातून पहिल्यांदा बॉलिवूडमध्ये पौराणिक कथेवर आधारित ‘रामायण’ हा चित्रपट येणार असल्याची घोषणा दिग्दर्शक नितेश तिवारीने केली. आगामी ‘रामायण’ या चित्रपटामध्ये रामाची व्यक्तिरेखा हृतिक रोशन साकारणार असून सीताची व्यक्तिरेखा दीपिका पदुकोण साकारणार आहे. पहिल्यांदाच हृतिक आणि दीपिका या दोघांची जोडी मोठा पडद्यावर एकत्र काम करताना दिसणार आहे.

‘रामायण’ या चित्रपटाचे दिग्दर्शन नितेश तिवारी आणि रवी उद्यावर करत आहे. एवढंच नाहीतर हा चित्रपट ३ डी स्वरुपात असणार आहे. हिंदी, तामिळ आणि तेलुगू या भाषेत हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. राम या व्यक्तिरेखेसाठी हृतिकची निवड ही चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी केली आहे. हृतिकने ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी होकार दिला आहे. तसेच चित्रपटाचे निर्माते मधू मंटेना यांनी सीता या भूमिकेसाठी दीपिका पदुकोणची शिफारस केली आहे. मात्र अद्यापही भूमिकांविषयी अधिकृत घोषणा करण्यात आली नाही आहे.

- Advertisement -

‘मी ‘रामायण’या चित्रपटाची निर्मिती करण्यास खुप उत्सुक आहे. माझ्या ‘छिछोरे’या चित्रपटाचे काम झाल्यानंतर मी ‘रामायण’ चित्रपटाकडे वळणार आहे. हा प्रोजेक्ट माझ्यासाठी आव्हानात्मक असणार आहे. हा चित्रपट हिंदी, तेलुगू आणि तामिळ भाषांमध्ये प्रदर्शित होणार असून या चित्रपटाचे बजेट ५०० कोटी रुपायांचं आहे,’ असं निर्माते नितेश तिवारी यांनी सांगितलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -