रणबीर कपूरच्या ‘शमशेरा’मध्ये झळकणार ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील ‘हा’ अभिनेता

या चित्रपटात रणबीर कपूरने मुख्य भूमिका साकारली असून ‘शमशेरा’ चित्रपटामध्ये रणबीर कपूर दोन भूमिका साकारताना दिसेल. रणबीर कपूरचा हा पहिला चित्रपट आहे ज्यामध्ये तो दोन भूमिका साकारत आहे

स्टार प्रवाह या टेलिव्हिजनवाहिनी वरील लोकप्रिय मालिका ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या मालिकेतील गौरी आणि जयदीपची जोडीचे अनेक चाहते सुद्धा आहेत. शिवाय या दोघांव्यतिरिक्त या मालिकेतील प्रत्येक पात्राने आपली जागा निर्माण केली आहे. वर्षा उसगावकर आणि सुनील गोडसे या दोन ज्येष्ठ कलाकारांनी मालिकेची शोभा वाढवली आहे. सुनील गोडसे यांनी मालिकेत जयदीपच्या वडीलांची भूमिका साकारली आहे. दादासाहेब शिर्केपाटील हे त्यांच्या भूमिकेचे नाव असून प्रेक्षकांकडून या त्यांच्या या भूमिकेचे खूप कौतुक होत असते. दरम्यान सुनील गोडसे रणबीर कपूरच्या ‘शमशेरा’ चित्रपटात दिसून येणार आहेत.

सुनील गोडसे यांनी शमशेरा शिवाय सिंबा, हायजॅक, काबूल एक्सप्रेस या चित्रपटांमध्ये काम केले आहे. याशिवाय त्यांनी वादळवाट, राजा शिवछत्रपती, पवित्र रिश्ता यांसारख्या बऱ्याच मालिकेत काम केले आहे.नुकताच या चित्रपटाचे ट्रेलर रिलीज करण्यात आले, या ट्रेलरमध्ये सुनील गोडसे यांनी एक झलक सुद्धा दिसून आली. मात्र या चित्रपटात त्यांची नक्की कोणती भूमिका आहे, हे अजून समजलेले नाही. या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद पाहायला मिळत आहे.

या चित्रपटात रणबीर कपूरने मुख्य भूमिका साकारली असून ‘शमशेरा’ चित्रपटामध्ये रणबीर कपूर दोन भूमिका साकारताना दिसेल. रणबीर कपूरचा हा पहिला चित्रपट आहे ज्यामध्ये तो दोन भूमिका साकारत आहे.चित्रपटातील रणबीर कपूरच्या एक पात्राचे नाव शमशेरा आहे तर , दुसऱ्या पात्राचे नाव बल्ली आहे. १५० करोडच्या बजेटमध्ये तयार झालेला ‘शमशेरा’ चित्रपट २२ जुलैला रिलीज होणार आहे. हा चित्रपट हिंदी व्यतिरिक्त तमिळ आणि तेलगू भाषेमध्ये सुद्धा रिलीज होणार आहे.