घरताज्या घडामोडीBirju Maharaj Passes Away: बिरजू महाराजांच्या जाण्याने कमल हसन भावूक

Birju Maharaj Passes Away: बिरजू महाराजांच्या जाण्याने कमल हसन भावूक

Subscribe

कथ्थक सम्राट बिरजू महाराज यांच्याकडून मी खूप काही शिकलो. अनेक वर्ष त्यांना एकलव्यासारखा लांबून पाहून खूप काही शिकत होतो. मात्र विश्वरुपम सिनेमाच्या निमित्ताने मला पंडीत बिरजू महाराजांच्या अगदी बाजूला बसून शिकण्याचा त्यांना अनुभवण्याची संधी मिळाली.

कथ्थक गुरू पंडीत बिरजू महाराजांच्या जाण्याने ( Birju Maharaj Passes Away)  सर्वत्र कलाविश्वात अनेक स्थरातून शोक व्यक्त केला जात आहे. त्यांचे अनेक कथ्थक शिष्य तसेच बॉलिवूड सेलिब्रेटींपासून देशाच्या पंतप्रधानांपर्यंत सर्वांनी बिरजू महाराजांच्या जाण्याने दुख: व्यक्त केले आहे. अभिनेते तसेच राजकारणी कमल हसन (Kamal Haasan )  यांना महाराजांच्या जाण्याने अतोनात दुख: झाले. कमल हसन यांनी विश्वरुपम सिनेमाच्या निर्मितीवेळी फार जवळून महाराजजींना पाहिले होते. कमल हसन यांच्या आयुष्यातही बिरजू महाराजांचे अढळ स्थान आहे. कमल हसन यांनी ट्विट करत बिरजू महाराजांना श्रद्धांजली वाहिली आहे.

कमल हसन यांनी म्हटले आहे की, ‘बिरजू महाराज हे अतुलनीय नर्तक होते. कथ्थक सम्राट बिरजू महाराज यांच्याकडून मी खूप काही शिकलो. अनेक वर्ष त्यांना एकलव्यासारखा लांबून पाहून खूप काही शिकत होतो. मात्र विश्वरुपम सिनेमाच्या निमित्ताने मला पंडीत बिरजू महाराजांच्या अगदी बाजूला बसून शिकण्याचा त्यांना अनुभवण्याची संधी मिळाली. त्यांनी आपले जीवन मृत्यू सगळ काही नृत्य आणि संगिताला समर्पित केले. त्यांचे अकाली जाणे फार कला जगतासाठी फार चटका लावून जाणारे आहे’.

- Advertisement -

विश्वरुपममधील एका गाण्याचे बिरजू महाराजांनी नृत्य दिग्दर्शन केले होते. बिरजू महाराजांनी कमल हसन यांना कथ्थक नृत्याचे धडे दिले होते.  बिरजू महाराज कमल हसन यांना शिकवतानाचे काही व्हिडीओ देखील व्हायरल झाले होते. महाराजांनी नृत्यातील बारकाई कमल यांना शिकवली होती. कमल हसन यांनी देखील अनेक वेळा मुलाखतीत बिरजू महाराजांचा उल्लेख करत त्यांचे आभार मानले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – Birju Maharaj: बिरजू महाराजांची आवडती शिष्य होती Madhuri Dixit, गुरुंना वाहिली श्रद्धांजली

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -