वादग्रस्त ट्वीटप्रकरणी अभिनेता कमाल खानला अटक, मुंबई विमानतळावरच घेतले ताब्यात

अभिनेता कमाल आर खान(kamal R khan) नेहमीच वादग्रस्त विधानं करत असतो. त्याच्या अशाच एका वादग्रस्त ट्विटमुळे कमाल खान अडचणीत सापडला आहे.

Kamal r khan
अभिनेता कमाल खान

अभिनेता कमाल खान(actor kamal khna ) हा ताच्या वादग्रस्त विधाने विधानांसाठी आणि ट्विट साठी नेहमीच चर्चेत असतो. अभिनेता कमाल आर खानला आज मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. कमाल खान विरोधात मुंबईतील मालाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. यांनतर मालाड पोलिसांनी अभिनेता कमाल खानला पोलिसांनी मुंबई(mumbai police) विमानतळावरून ताब्यात घेतले.

हे ही वाचा – ललित मोदी जवळचे पैसे संपले का?…सुष्मिता आणि रोहमनला पुन्हा एकत्र पाहून सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस

अभिनेता कमाल आर खान(kamal R khan) नेहमीच वादग्रस्त विधानं करत असतो. त्याच्या अशाच एका वादग्रस्त ट्विटमुळे कमाल खान अडचणीत सापडला आहे. याच ट्विटमुळे कमाल खान यांच्याविरोधात अटकेची कारवाई करण्यात आली आहे. कमाल आर खानला पोलिसांनी मुंबई विमानतळावरून अटक केली आणि त्या नंतर त्याची चौकशी केली. अभिनेता कमाल आर खान याला २०२० मध्ये नोंद करण्यात आलेल्या एका गु न्ह्यामध्ये ही अटक करण्यात आली होती. कमाल खान याने सोशल मीडियावरून धर्मासंदर्भांत एक वादग्रस्त ट्विट केले असा आरोप केला आहे.

हे ही वाचा – माझी बाजू न मांडता तुझी इज्जत वाचवली…उर्वशी रौतलेचा ऋषभ पंतवर निशाणा

दरम्यान अभिनेता कमाल खान बॉलिवूड मधील अनेक मोठ्या अभिनेत्यांवर टीका करत असतो. कमाल खान वादग्रस्त विधान केल्यामुळे अडचणीत सापडल्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी सुद्धा अभिनेता कमाल खान त्याच्या वादग्रस्त ट्विट मुळे चर्चेत आला होता. याआधी कमाल खान याने बॉलिवूड मधील सलमान खान(salman khan) आणि शाहरुख खान(SRK) यांच्यावरही टीका केली आहे.

हे ही वाचा – सोनाली फोगाट मृत्यू प्रकरणाला वेगळी कलाटणी, गोवा पोलिसांनी दोन जणांवर केला हत्येचा गुन्हा दाखल