Sara Tendulkar: सारा तेंडुलकरच्या फोटोवर कार्तिक आर्यन घायाळ, पहा फोटो

क्रिकेटर शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर यांच्या अफेअरची तुफान चर्चा देखील सोशल मीडियावर रंगली होती

actor kartik aryan comment on sara tendulkar;s photo

भारतीय क्रिकेटर सचिन तेंडुलकरची ( Sachin Tendulkar) मुलगी सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) तिच्या सुंदरतेमुळे आणि साधेपणामुळे नेहमीच चर्चेत असते. साराने नुकताच सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. जो प्रचंड व्हायरल झाला असून फोटो पाहून अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aryan) देखील घायाळ झालाय. साराचा सोशल मीडियावर एक वेगळा चाहता वर्ग आहे आणि फॅन फॉलोविंग आहे.साराच्या प्रत्येक फोटोची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा होत असते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sara Tendulkar (@saratendulkar)

साराने तिच्या सोशल मीडियावर तिचा एक फोटो पोस्ट करत, ऑल स्माइल्स इन द सिटी असे कॅप्शन दिले आहे. नेहमीप्रमाणे सारा तेंडुलकर या फोटोमध्ये मनमुराद हसताना दिसत आहे. तिचा साधेपणा नेहमीच सर्वांच्या पसंतीस उतरतो. साराचा खुबसुरत फोटो पाहून बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनने देखील लाईक करत साराच्या फोटो कमेंट देखील केली आहे. साराने फोटो पोस्ट करताच आतापर्यंत फोटोला लाखो लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत. साराच्या सुंदरतेचे आणि साधेपणाचे सर्व कौतुक करताना दिसत आहेत.

क्रिकेटर शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर यांच्या अफेअरची तुफान चर्चा देखील सोशल मीडियावर रंगली होती. शुभमन आणि सारा एकमेकांना सोशल मीडियावर फॉलो करतात. तर शुभमन साराच्या संपूर्ण फॅमिलीला देखील फॉलो करतो. दोघांनाही सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले होते मात्र त्यांच्या नात्याविषयी त्यांनी अद्याप कोणताही खुलासा केलेला नाही.

सारा ही स्टार किड्सची मुलगी म्हणून सध्या चांगलीच चर्चेत आहे. साराने लंडनमधून तिचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले आहे. सारा ही मेडिकल स्टुडंट आहे. साराचे शालेय शिक्षण हे मुंबईच्या धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून झाले आहे. सारा सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. इंन्स्टाग्रामवर साराचे जवळपास १४ लाख फॉलोवर्स आहेत.


हेही वाचा – Navratri 2021: मराठमोळ्या अभिनेत्रींनी धरला भोंडल्यावर ताल