घरमनोरंजनमहिमा चौधरी हजर राहिलेल्या पार्टीतील ९ जण कोरोना पॉझिटिव्ह

महिमा चौधरी हजर राहिलेल्या पार्टीतील ९ जण कोरोना पॉझिटिव्ह

Subscribe

देशात एकीकडे कोरोना लसीकरण मोहिमेला वेगाने सुरुवात झाली असतानाच पॉझिटिव्ह रुग्णांची संख्याही वाढत आहे. सण, समारंभ, पार्टी, सार्वजिनक कार्यक्रमांमुळे कोरोना संसर्ग वेगाने होत आहे. यातच लखनऊमध्ये हॉटेल रेडिसनमधील एका पार्टीमुळे मंगळवारी नऊ हॉटेल कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. या हॉटेलमधील स्वयंपाक गृहात काम करणारे हे कर्मचारी होते. याबरोबरचं पार्टीत सहभागी इतर २५ जणांनाही कोरोनाची लागण झाली आहे. रविवारी झालेल्या या पार्टीमध्ये अभिनेत्री महिमा चौधरी यांच्यासह शहरातील अनेक प्रतिष्ठीत व्यक्ती सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे कोरोना रुग्ण संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्थानिक प्रशासनाने हे हॉटेल ४८ तासांसाठी सील केले आहे.

लखनऊच्या आरोग्य विभागाने हॉटेल रेडिसनमधील ३० लोकांचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. या नमुन्यांची तपासणी केली असता हॉटेलमधील ९ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे आरोग्य प्रशासननाकडून इतर हॉटेल कर्मचाऱ्यांनाही क्वारंटाईन केले आहे. तसेच पॉझिटिव्ह आढळलेल्या कर्मचाऱ्यांचे स्वॅब आरटीपीसीआर चाचणीसाठी पाठवले आहेत. तर पॉझिटिव्ह आढळलेल्या कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या ६० लोकांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. या ६० लोकांमधील २४ जण हे बाहेरून आले होते. याचबरोबर अन्य १४ जणांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात येणार आहेत. अशी माहिती कॉन्टक्ट आणि ट्रेसिंग इंचार्ज डॉ. एमके सिंह यांनी दिली.

- Advertisement -

डॉ. एमके सिंह यांनी सांगितले की, ६ महिन्यानंतर एवढ्या मोठ्याप्रमाणात कोरोनाचा हॉटस्पॉट सील झाला आहे. या हॉटेलमध्ये ९ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने अजूनही मोठी रुग्ण साखळी तयार होण्याची भीती आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाकडून सावधानतेने पावले उचलली जात आहेत. या हॉटेलमध्ये तीन दिवसांपासून येणाऱ्या जाणाऱ्यांची माहिती घेतली जात आहे. तसेच मंगळवारी पाठवलेल्या स्वॅबच्या आरटीपीसीआर रिपोर्ट आल्यानंतर हॉटेल खुले केले जाणार आहे.


हेही वाचा- कंगणाला ऑफिससाठी आर्किटेक्ट मिळेना

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -