अभिनेता मिथुन रमेश रुग्णालयात दाखल, बेल्स पाल्सी आजाराने त्रस्त

नवी दिल्ली : मल्याळम अभिनेता आणि अँकर मिथुन रमेश आजारी असल्यामुळे त्यांला केरळमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेता-अँकर मिथुनला बेल्स पाल्सी या आजाराने ग्रासल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. बेल्स पाल्सी म्हणजे एका बाजूने चेहऱ्याला अर्धांगवायू करणारी ही स्थिती आहे. मिथुनने स्वतः व्हिडिओ शेअर करून या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

मिथुनने शेअर केलेल्या या व्हिडिओच्या माध्यमातून त्याने चाहत्यांना आरोग्यसंबंधी माहिती दिली आहे. अभिनेत्याने सांगितले की, त्याला सौम्य बेल्स पाल्सीचा पक्षाघात झाला आहे आणि तो एकाच वेळी दोन्ही डोळे बंद करू शकत नाही. त्याच्यावर त्रिवेंद्रममधील अनंतपुरी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचेही मिथुनने सांगितले. यासोबतच मिथुनची पत्नी लक्ष्मी मेननने नुकतेच एका पोस्टमध्ये लिहिले की, त्याला प्रार्थनांची गरज आहे. मिथुनला 2021 च्या सुरुवातीला टँप्रेपी फेशियल पॅरालिसिसचा त्रासही झाला होता. डॉक्टर आणि फिजिओथेरपीच्या मदतीने त्यांची प्रकृती आता सुधारत आहे.

हेही वाचा – खलिस्तान समर्थकांना आव्हान देत कंगना म्हणाली, “…लाज वाटते का?”

मिथुनने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलच्या पोस्टमध्ये एक व्हिडिओ शेअर करत त्याच्या आजारासंबंधी माहिती दिली. मिथुनने स्पष्टपणे सांगितले की त्याची प्रकृती गंभीर नसली तरी हा आजार त्याच्या भावनिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम करू शकतो.

कोण आहे मिथुन रमेश?
मिथुन रमेश यांने 2000 साली ‘लाइफ इज ब्यूटीफुल’ या चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर त्याने अनेक रेडिओ शो होस्ट करण्याव्यतिरिक्त, रमेश फ्लॉवर टीव्हीवर ‘कॉमेडी उत्सवम’ देखील होस्ट केले. ‘कॉमेडी उत्सवम’ हा एक अतिशय लोकप्रिय टॅलेंट हंट शो आहे. याशिवाय शेषम, रन बेबी, सॅम आणि जिमी ई विदिंते ऐश्वर्याम या चित्रपटांतही त्याने काम केले आहे. मिथुनने रेडिओ कार्यक्रमांमध्ये देखील सहभाग घेतला आहे. मिथुन रमेश हा मल्याळम सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. त्यामुळे त्याच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.