अभिनेते नाना पाटेकरांचा मुलगा चित्रपटांमध्ये अभिनय नव्हे, तर करतो ‘हे’ काम

बॉलिवूड आणि मराठी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे दिग्गज अभिनेते नाना पाटेकरांचे लाखो चाहते आहेत. नाना पाटेकर यांचा प्रत्येक चित्रपट सुपरहिट ठरतो. नाना पाटेकर एक उत्तम अभिनेतेच नाही तर उत्तम लेखक देखील आहेत. त्यांना अनेकदा राष्ट्रीय फिल्म पुरस्कार आणि फिल्मफेअर पुरस्कार देऊन देखील सन्मानित करण्यात आलं आहे. नाना पाटेकर यांना पद्मश्री या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध नाना पाटेकर यांचा मुलगा देखील हुबेहुब त्यांच्या सारखा देत असल्याचं म्हटलं जातं.

नाना पाटेकर यांच्या मुलाचं नाव मल्हार पाटेकर आहे. मल्हार पाटेकर हुबेहुब त्याचे वडील नान पाटेकर यांच्या सारखाच दिसतो. मल्हार पाटेकरला देखील चित्रपटांमध्ये काम करायची आवड आहे. त्याने ‘द अटॅक ऑफ 26/11’ या चित्रपटामध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे.

स्वतःच प्रोडक्शन हाऊस
नाना पाटेकर यांचा मुलगा मल्हार पाटकरला स्वतःचं एक प्रोडक्शन हाऊस आहे. त्याला अभिनयापेक्षा चित्रपटात निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून काम करायला मल्हारने पसंती दिली आहे. त्याचा प्रोडक्शन हाऊसचं नाव नाना साहेब प्रोडक्शन हाऊस आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nana patekar (@nana.patekar)

नाना पाटेकर आणि त्यांची पत्नी नीलकांती हे वेगळे झाले आहेत. मल्हार त्यांचा दुसरा मुलगा आहे. त्यांचा पहिल्या मुलाचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून हे दोघेही वेगळे राहतात.

 


हेही वाचा :

ऐश्वर्या राय बच्चनचा ‘पोन्नियिन सेल्वन 2’ ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित