घरताज्या घडामोडीनसीरुद्दीन शाह यांच्या फुफ्फुसात पॅच, रुग्णालयात केलं दाखल

नसीरुद्दीन शाह यांच्या फुफ्फुसात पॅच, रुग्णालयात केलं दाखल

Subscribe

नसीरुद्दीन शाह यांना निमोनिया झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते

बॉलिवूड अभिनेते नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) यांना निमोनिया झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Actor Naseeruddin Shah hospitalized)  गेल्या दोन दिवसांपासून नसीरुद्दीन शाह मुंबईच्या हिंदूजा रुग्णालयात उपचार घेत आहेत. नसीरुद्दीन शाह यांना निमोनिया सोबतच फुफ्फुसात पॅच आढळला आहे. (Actor Naseeruddin Shah hospitalized because Diagnosed lung patch ) सध्या त्यांची पत्नी रत्ना पाठक आणि त्यांची मुले रुग्णालयात त्यांच्यासोबत आहेत. नसीर लवकरच ठिक होतील अशी प्रार्थना करुया,असे त्यांच्या मॅनेजरने म्हटले आहे. ई टाईम्सने दिलेल्या माहितीनुसर नसीरुद्दीन शाह यांना निमोनिया झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचारादरम्यान फुफ्फुसात पॅच असल्याचे निदर्शनास आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना देखील श्वास घेण्यास त्रास होत असल्याने आज मुंबईच्या हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिलीप कुमार यांच्या नंतर आता नसीरुद्दीन यांच्या बातमीने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

- Advertisement -

गेल्या वर्षी नसीरुद्दीन शाह आजारी असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. त्यानंतर त्यांच्या मुलाने या अफवांवर स्पष्टीकरण देऊन त्यांना आळा घातला होता. ‘सगळ ठिक आहे. बाबा बरे आहे. त्यांच्या आजारपणाची माहिती खोटी आहे. ते पूर्णपणे ठिक आहेत’, असे ट्विट त्यांच्या मुलाने केले होते.

- Advertisement -

नसीरुद्दीन शाह यांचे वय आता ७० वर्ष आहे. १९७५ साली त्यांनी ‘निशांत’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. नसीरुद्दीन शाह यांनी आतापर्यंत १०० हून अधिक सिनेमात काम केले आहे. नुकतेच ते ‘राम प्रसाद की तेरहवी’ या सिनेमात दिसून आले होते. मोठ्या पडद्यावर काम करत असतानाच रसीरुद्दीन शाह यांनी नाटकात देखील काम केले. अभिनयासाठी त्यांना ३ वेळा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.


हेही वाचा – अभिनेत्री मंदिरा बेदीच्या पतिचं हृदय विकाराच्या झटक्याने निधन

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -