Saturday, May 8, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन मालदीव व्हॅकेशनला गेलेल्या सेलेब्रिटींवर अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकीने साधला निशाणा, म्हणाला...

मालदीव व्हॅकेशनला गेलेल्या सेलेब्रिटींवर अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकीने साधला निशाणा, म्हणाला…

फोटो पोस्ट करून सेलेब्रिटी अन्नाचा नासडा करत आहेत थोडी तरी लाज बाळगा. सुट्ट्या एंजॉय करण्यात काहीच चुकीच नाही पण सध्या

Related Story

- Advertisement -

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता अनेक देशांमध्ये परत एकदा लॉक डाऊन लावण्याची वेळ आली आहे. भारतामध्येही अनेक राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. कोरोना व्हायरसला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ‘ब्रेक द चेन’ मोहिमे अंतर्गत नियम व अटी लागू करून फक्त अत्यावशक सेवा वगळता इतर कोणालाही बाहेर पडण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. पण अनेक सेलेब्रिटी मात्र मालदिव मध्ये जाऊन मजेत सुट्टी घालवतांना दिसत आहे. आणि अशा सेलेब्रिटींवर अभिनेता नवझुद्दीन सिद्दीकी मात्र चांगलाच भडकला आहे.नवाजने एका मुलाखती दरम्यान सेलेब्रिटींवर निशाणा साधला आहे.

नवाजने म्हंटल आहे की,’ संपूर्ण देश हा कोरोना महामारीशी लढत असून सेलेब्रिटी मात्र एंजॉय करत आहेत. कित्येक लोकांची आज उपासमार होत आहे आणि अशा वेळेस सुद्धा सोशल मीडियावर मालदिव मधील फोटो पोस्ट करून सेलेब्रिटीं अन्नाचा नासडा करत आहेत थोडी तरी लाज बाळगा. सुट्ट्या एंजॉय करण्यात काहीच चुकीच नाही पण सध्या आपला देश एका महा भयंकर समस्येशी लढत आहे. आणि अशा प्रकारे फोटो पोस्ट करणे अत्यंत चुकीचे आहे. मला माहिती आहे कि टूरिजम इंडस्ट्री सोबत तुमचं काय डिल ठरलेली असते. पण मानवतेच्या दृष्टीकोणातून विचार करून तुमच्या सुट्ट्या अशा प्रकारे जगजाहीर करू नका तुमच्या पर्यंतच तो आनंद ठेवा.” अश्या तीक्ष्ण शब्दात नवाजने सेलेब्रिटींवर टीका केली आहे.

- Advertisement -

वर्क फ्रंट बाबतीत सांगायचे झाल्यास नवाजचा काही दिवसांपूर्वी ”बारीश की जाए” अल्बम सॉन्ग रिलीज झालं होत तसेच या गाण्याला चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. नवाज अभिनेत्री तमन्ना भाटीया सोबत ”बोले चूड़ियां’ ‘ या चित्रपटात दिसणार आहे.


हे हि वाचा – Arijit Singh Birthday: एकेकाळी रियालिटी शो मधून बाहेर पडावं लागलं, या गाण्यानंतर चमकले अरिजीत सिंगचे नशीब

- Advertisement -