घरमनोरंजनसआदत हसन 'मंटो'चा जीवनपट रुपेरी पडद्यावर

सआदत हसन ‘मंटो’चा जीवनपट रुपेरी पडद्यावर

Subscribe

पाकिस्तानी लेख सआदत हसन मंटो यांच्या जीवनावर आधारीत मंटो हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शीत होत आहे. या चित्रपटात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी मंटोच्या प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

अभिनेत्री नंदिता दास यांचा महत्त्वाकांक्षी ‘मंटो’ हा चित्रपट अखेर उद्या, २१ सप्टेंबर रोजी प्रदर्शीत होत आहे. पाकिस्तानी लेखक सआदत हसन मंटो यांच्या आयुष्यावर बेतलेला हा सिनेमा आहे. बॉलीवूडचा मोस्ट वॉन्टेड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी या चित्रपटात मंटो यांच्या प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. मंटो हे त्या काळीतील एक वादग्रस्त लेखक ठरले होते. त्यांनी आपल्या लेखणीतून असे काही मुद्दे मांडले ज्यामुळे त्यांच्यावर कोर्टात केस दाखल झाल्या होत्या. ‘मंटो’ची भूमिका साकारण्यासाठी नवाजुद्दीन ही पहिली पसंती असल्याची प्रतिक्रीया नंदिता दास यांनी दिली. या चित्रपटात नवाजसोबत परेश रावल, ऋषी कपूर, राजश्री देशपांडे, ताहिर राज भसीन यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. तर अभिनेत्री रसिका दुग्गल हिने मंटोच्या पत्नीची व्यक्तीरेखा साकारली आहे. गीतकार जावेद अख्तर आणि स्वानंद किरकिरे देखील छोट्या भूमिकांमध्ये प्रेक्षकांना दिसणार आहेत.

- Advertisement -

कोण होते लेखक ‘मंटो’

बहुतांश प्रेक्षकांना सआदत हसन मंटो यांच्या विषयी जुजबी माहिती आहे. भारतीयांनाही मंटो यांची माहिती मिळावी यासाठी चित्रपट बनवत असल्याचे नंदिता दास यांनी सांगितले आहे. मंटो हे २० व्या शतकातील प्रसिद्ध लेखक होते. उत्तर भारतीय उर्दू भाषेत त्यांनी १९३० – ४० च्या कालखंडात लिहिलेली मंटो की लघु कहानिया खळबळ माजवणारी हिंसाचाराने भारलेली होती. यातील काही विषयांना ‘मंटो’ चित्रपटात दाखवण्यात आले आहे. या चित्रपटासाठी गुजरातमध्ये पाकिस्तानचा सेट उभारण्यात आला होता.

reel and real manto
वास्तवातील आणि रुपरी पडद्यावरील मंटो (सौजन्य-ट्विटर)

पाकिस्तानातही मंटोवर चित्रपट

अभिनेत्री नंदिता दास यांचा पहिला दिग्दर्शनाचा ‘फिराक’ हा चित्रपट २००२ साली प्रदर्शीत झाला होता. या चित्रपटाची गोष्ट गुजरातच्या दंगलींवर बेतलेली होती. आता पुन्हा एकदा नंदिता एक वादग्रस्त विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मात्र मंटो यांच्या आधारीत हा पहिलाच चित्रपट नसून यापूर्वी २०१५ साली ‘मंटो’ याच नावाने पाकिस्तानमध्ये चित्रपट बनवण्यात आला होता. याचे दिग्दर्शन सर्मद खूसद यांनी केले होते. तसेच चित्रपटात त्यांनी भूमिकाही साकारली होती. ‘मंटो’ यांना दारू पिण्याच व्यसन जडल होतं. त्यामुळे वयाच्या अवघ्या ४२ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -