घरमनोरंजननवाजुद्दीनच्या पत्नीने घटस्फोटात काय काय मागितलं?

नवाजुद्दीनच्या पत्नीने घटस्फोटात काय काय मागितलं?

Subscribe

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या पत्निने घटस्फोटाची मागणी केली आहे.

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी घटस्फोटाच्या बातमीने पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी आलिया सिद्दीकीने त्याला कायदेशीर नोटीस पाठवली आहे, त्यात तिने घटस्फोटासह आणखी बऱ्याच मागण्या केल्या आहेत. असं सांगितलं जातंय की लग्न झाल्यापासून दोघांमध्येही पटत नव्हतं. १० वर्षांपासून नात्यात बरेच वाद झाले.

आलियाचे वकील अभय सहाय आणि आलिया यांनी स्वत: बॉम्बे टाईम्सशी आलियाने पाठविलेल्या कायदेशीर नोटीसविषयी सांगितलं. यासह तिने नवाजुद्दीन सिद्दीकीकडून काय मागितलं याबद्दलही सांगितलं. आलियाने या मुलाखतीत सांगितलं की, “बर्‍याच गोष्टी आहेत ज्या मला जाहीर करायच्या नाहीत, परंतु दोघांमध्ये १० वर्षांपूर्वी लग्न झाल्यापासून वाद सुरु झाले. २ महिन्यांच्या लॉकडाऊनने तिला आत्मपरीक्षण करण्यासाठी बराच वेळ दिला. वैवाहिक जीवनात स्वाभिमान खूप महत्वाचा असतो. माझा स्वाभिमानच संपवला आहे. मी कोणीच नाही अशी वागणूक मला दिली. मला नेहमीच एकटं वाटलं.”

- Advertisement -

हेही वाचा – CoronaVirus: प्रतिबंधित लसीशिवाय ‘हे’ नवं औषधं थांबवू शकतं कोरोनाचा फैलाव!


आलिया पुढे म्हणाली, “मी माझं नाव परत अंजना किशोर पांडे असं ठेवलं आहे. मी माझ्या स्वत: च्या फायद्यासाठी दुसर्‍याची ओळख वापरत आहे याची कोणी मला पुन्हा पुन्हा आठवण करून द्यावी अशी माझी इच्छा नाही.” याशिवाय आलियानेही आपल्या मुलांना ताब्यात घेण्याची मागणी केली आहे. यासह आलियाने नवाजुद्दीनचा भाऊ शामसवरही आरोप केला आणि म्हणाली की त्याचा भाऊ देखील घटस्फोटाचं कारण आहे. नवाजने २००९ मध्ये आलियाशी लग्न केलं होतं. त्यांना दोन मुलेही आहेत. यापूर्वी नवाजचे शीबाशी लग्न झालं होतं, जे काही काळ टिकलं.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -