थंगबली Nikitin Dheerच्या घरी लवकरच हलणार पाळणा

Actor Nikitin Dheer And Wife Kritika Segar Expected Their First Child Shared Good News With Fans
थंगबली Nikitin Dheerच्या घरी लवकरच हलणार पाळणा

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रीपैकी एक कृतिक सेंगर (kritika Sengar) आणि चेन्नई एक्स्प्रेस (Chennai Express) चित्रपटातील थंगबली भूमिका निभावणारा निकितिन धीर (Nikitin Dheer) हे दोघं आई-वडील होणार आहेत. यामुळे अभिनेते पंकज धीर यांच्या घरी पहिल्यांदा लहान मुलाचा आवाज ऐकू येणार आहे. कृतिका सेंगरने पती निकितिन धीरसोबत फोटो शेअर करत आपल्या चाहत्यांना ही खुशखबर दिली आहे. कृतिका सेंगर फोटोमध्ये बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे. सोशल मीडियावर या कपलने जशी ही आनंदाची बातमी दिली, तसे सर्व कलाकार आणि चाहते त्यांना शुभेच्छा देत आहेत.

कृतिकाने हा फोटो शेअर करत लिहिले की, ‘२०२२मध्ये धीर ज्युनिअर येणार आहे.’ फोटोमध्ये कृतिका स्काय ब्लू सूटमध्ये दिसत आहे आणि निकितिन गोल्ड कुर्ता पायजमामध्ये दिसत आहे. कृतिकाच्या या पोस्टवर अक्षरा सिंह, किश्वर मर्चेंट, अंकिता लोखंडे, नमन शॉ, स्मृति खन्ना, रिद्धिमा पंडित, गौहर खानसह अनेक सेलिब्रेटींनी प्रतिक्रिया दिली आहे आणि या कपलला शुभेच्छा दिल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kratika Sengar Dheer (@itsmekratika)

कृतिका सेंगरने ‘राणी लक्ष्मीबाई’ आणि ‘कसम तेरे प्यार की’ सारख्या शोमध्ये काम करून लोकप्रियता मिळवली होती. २०१४ साली कृतिकाने निकितिन धीरसोबत लग्न केले. ‘छोटी सरदानी’ मालिकेमध्ये काही दिवसांसाठी कृतिका कॅमिओ करताना दिसली होती. तर निकितिन धीरने चित्रपटाव्यतिरिक्त अनेक टीव्ही शोमध्ये काम केले आहे. परंतु सर्वात जास्त निकितिनला लोकप्रियता थंगबली या भूमिकेमुळे मिळाली.


हेही वाचा – chhatriwali: अभिनेत्री रकुल प्रीत सिंह दिसणार कंडोम टेस्टरच्या भूमिकेत