अभिनेता ओंकार भोजनेंचे आमदार सत्यजित तांबेंकडून पोस्ट शेअर करत कौतुक

अभिनेता ओंकार भोजनेचा एका गाण्याचा व्हिडीओ सोशल मिडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ओंकार कविता सादर करताना दिसत आहे. हा व्हिडीओ आता अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांनी शेअर करत ओंकारचे कौतुक केले आहे.

Actor Omkar Bhojan was praised by MLA Satyajit Tambe by sharing a post

अभिनेता ओंकार भोजनेचा एका गाण्याचा व्हिडीओ सोशल मिडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ओंकार कविता सादर करताना दिसत आहे. हा व्हिडीओ आता अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांनी शेअर करत ओंकारचे कौतुक केले आहे.

महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून घराघरांत पोहोचलेला अभिनेता ओंकार भोजने पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. महाराष्ट्राची हास्य जत्रा हा कार्यक्रम सोडल्यानंतर ओंकारला ट्रोल करण्यात आले होते. पण प्रेक्षकांचे अजूनही त्याच्यावर प्रेम कायम आहे. नुकतेच ओंकारने एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमात त्याने “तुझी तुलाच पुरी करायची, हौस आकाशी उंच उडायची..” ही कविता सादर केली. पण त्याच्या या कवितेचा हा व्हिडीओ इतका शेअर झाला की अनेकांनी त्याचे कौतुक सुद्धा केले.

ओंकारला पहिल्यापासूनच कवितांची आवड आहे. याआधी सुद्धा त्याने “महाराष्ट्राची हास्यजत्रा”, “फू बाई फू” या कार्यक्रमांमध्ये कविता सादर केलेल्या आहेत. तिथे देखील त्याचे भरभरून कौतुक करण्यात आले. पण आता त्याने नव्याने सादर केलेल्या कवितेचा व्हिडीओ देखील तितकाच शेअर करण्यात येत आहे. अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांनी सुद्धा हा व्हिडीओ शेअर करत ओंकार भोजनेचे कौतूक केले आहे सत्यजित तांबे आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “तुझी तुलाच पुरी करायची, हौस आकाशी उंच उडायची…कमाल गायलंस मित्रा, ओंकार भोजने !”

 

View this post on Instagram

 

A post shared by Satyajeet Tambe (@satyajeettambe)

 याआधी ओंकारने महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमामध्ये “तू दूर का?… मी असा मजबूर का?” हि कविता सादर केली होती. याचे नंतर गाणे सुद्धा तयार करण्यात आले. या कवितेचा व्हिडीओ देखील मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. दरम्यान, ओंकार भोजने याने महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम सोडल्यानंतर प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती. यानंतर त्याने “फू बाई फू” हा कार्यक्रमामध्ये दिसला. पण या कार्यक्रमामध्ये प्रेक्षकांनी त्याला नापसंत केले. ओंकार भोजने याने अनेक मराठी चित्रपटांमध्ये सुद्धा काम केले आहे.

हेही वाचा – तुम देना साथ मेरा…; पत्नीच्या निधनानंतर दहा तासांनी पतीचेही निधन, सोलापुरात गाव शोकाकूळ