‘सिनेसृष्टीत घराणेशाही ही नेहमीच असणार, पण…’, अभिनेता राजकुमार रावचं स्पष्ट मत

राजकुमार रावने नुकतच एका मुलाखतीत चित्रपटसृष्टीतील घराणेशाही बद्दल वक्तव्य केले आहे. 'चित्रपटसृष्टीत घराणेशाही ही कायम असणार आहे'. असं वक्तव्य राजकुमार रावने(rajkumar rao) केले.

हिंदी सिनेसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक म्हणजे राजकुमार राव. आपल्या अभिनयाच्या जोरावर राजकुमारने चित्रपट सृष्टीमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. राजकुमाराने हटके भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. राजकुमार रावने शादी मैं जरूर आना(shadi mai jaroor ana), गँग्स ऑफ वासेपूर, लव सेक्स और धोका यासारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. राजकुमार रावने नुकतच एका मुलाखतीत चित्रपटसृष्टीतील घराणेशाही बद्दल वक्तव्य केले आहे. ‘चित्रपटसृष्टीत घराणेशाही ही कायम असणार आहे’. असं वक्तव्य राजकुमार रावने(rajkumar rao) केले.

आणखी वाचा – ‘वाय’ चित्रपटाने प्रेरित होऊन चित्रपटगृहातच केलं मुलीचं बारसं

आणखी वाचा – ‘गोव्याला गेलो तरी २० – २५ हजार खर्च होतात’. संतोष जुवेकरची दत्तक…

अभिनेता राजकुमार रावने नुकतीच ‘इंडिया टुडे'(india today) ला मुलाखत दिली. या मुलाखतीत राजकुमार म्हणाला ‘चित्रपटसृष्टीत घराणेशाही ही नेहमीच असेल. पण आता अनेक संधी सुद्धा निर्माण होत आहेत. माझे अनेक मित्र जे माझ्यासोबत अभ्यास करायचे त्यांनाही आता ओटीटी मुळे ओळख मिळत आहे. जयदीप अहलावत ने पाताललोक मध्ये फार छान काम केले आहे.. तर स्कॅम १९९२ मध्ये प्रतीक गांधीने चांगले काम केले आहे. त्यामुळे ‘चित्रपटसृष्टीत घराणेशाही ही नेहमीच असणार आहे. पण तुमचे काम आणि टॅलेन्ट आपोआपच बोलेल.’

आणखी वाचा – अशोक पत्कींच्या संगीत साजाने पुन्हा एकदा साकारतोय ‘श्यामची आई’ चित्रपट

आणखी वाचा –  रणवीर सिंह साकारणार ‘शक्तिमान’ची भूमिका

‘चित्रपट हिट होण्याचा फॉर्म्युला कोणलाही माहीत नाही. त्यासाठी तुम्हाला सातत्याने प्रयत्न करत राहावे लागेल. आणि त्यानंतर त्या गोष्टी नशिबावर सोडाव्या लागतील. दाक्षिणात्य चित्रपट(south movie) हिट कसे होतात याचा मी विचार केलेला नाही. कदाचित ते चांगले चित्रपट असावेत. त्यासाठी ते फार मेहनत घेतात” असंही अभिनेता राजकुमार राव(rajkumar rao) याने सांगितले. राजकुमार राव हा हिंदी चित्रपट सृष्टीमधील एक उत्तम आणि आघाडीचा अभिनेता आहे.