‘जिवाभावाची साथ लाभली ती म्हणजे सलमान भाऊ यांची’, अभिनेता रितेश देशमुखचं दिग्दर्शनात पदार्पण

अभिनेता रितेश आता दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसणार आहे. रितेश देशमुखने आषाढी एकादशीच्या निमित्ताने एक खास पोस्ट शेअर करत या संदर्भांत माहिती दिली.

हिंदी चित्रपट सृष्टीत काम करत अस्सल मराठमोळा अभिनेता रितेश देशसमुख(ritesh deshmukh) याने त्याच्या अभिनयाने सर्वांच्याच मनात स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. बॉलिवूड मधील अनेक हिट चित्रपटांमध्ये अभिनेता रितेश देशमुख याने महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. हिंदी चित्रपटांमध्ये काम करत असताना रितेश देशमुखने ‘लय भारी’ हा त्याच्या पहिल्या मराठी चित्रपटातून प्रेक्षसकांसमोर आला. पण आता रितेश मराठी चित्रपट सृष्ष्टीमधे एक नवी सुरुवात करतो आहे. अभिनेता रितेश आता दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसणार आहे. रितेश देशमुखने आषाढी एकादशीच्या (ashadhi ekadashi) निमित्ताने एक खास पोस्ट शेअर करत या संदर्भांत माहिती दिली.

हे ही वाचा – ‘विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल,’ लहानग्या परीचा आषाढी एकादशी निमित्त खास व्हिडीओ

रितेश देशमुखने(ritesh deshmukh) त्याच्या एका नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘वेड’ असं रितेशच्या नव्या चित्रपटाचं नाव आहे. आजच्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने रितेशने सर्वांना शुभेच्छा देताना त्याच्या नवीन चित्रपटाची घोषणा करत आपल्या चाहत्यांना माहिती दिली आहे. त्याच बरोबर रितेशने या चित्रपटा संदर्भात काही खास गोष्टी सुद्धा चाहत्यांसोबत शेअर केल्या आहे. त्याचसोबत बॉलिवूडचा चुलबुल पांडे म्हणजेच अभिनेता सलमान खान(salman khan) याच्यासाठी सुद्धा त्याने त्याच्या पोस्ट मध्ये एक खास ओळ लिहिली आहे.

हे ही वाचा – ऋतिक रोशन आणि सबा आजाद फ्रांसमध्ये एकत्र

 

View this post on Instagram

 

A post shared by Ritesh Deshmukh (@riteishd)

 रितेश देशमुखने त्याच्या पोस्ट मध्ये म्हटले आहे, की
आषाढी एकादशीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा.
पांडुरंगाच्या साक्षीने मी मराठी चित्रपटक्षेत्रात पाऊल ठेवलं आणि आज त्याच विठूमाऊलीच्या आषाढीला सांगतांना अतिशय आनंद होतोय की मी दिग्दर्शित केलेल्या पहिल्या मराठी चित्रपटाचं चित्रीकरण नुकतंच पूर्ण झालं आहे .
अनेक अडचणीतून मार्ग काढत मी आणि माझ्या टीमने पहिला टप्पा यशस्वीपणे गाठला आहे आणि आता पुढचा पूर्णत्वाचा प्रवास आणखी बरंच शिकवणारा असणार आहे पण जर तुमच्या पाठीशी तुमची जिवाभावाची माणसं असतील तर हा प्रवास आणखी सोपा होतो.
अशाच एका जिवाभावाच्या माणसाची साथ आमच्या चित्रपटाला लाभली ते म्हणजे ‘सलमान भाऊ’ . माझ्या पहिल्या मराठी चित्रपटाला भाऊंनी #लईभारी साथ दिली होती आता भाऊने माझ्या पहिल्या दिग्दर्शकीय चित्रपटात आणखी एक #वेड केलंय.
थॅक्यु भाऊ. लव यू.

तुम्हा सर्वांच्या सदिच्छांमुळे वेड पूर्ण झाला आहे .

आणि आता… वेडेपणा सुरु होणार आहे. तेव्हा भेटूया लवकरच… चित्रपटगृहात !!

रितेश विलासराव देशमुख
रितेश देशमुखने पोस्ट करत त्याला असं खास कॅप्शन सुद्धा दिले आहे.

हे ही वाचा –  ‘धर्मवीर’ सिनेमाचे निर्माते मंगेश देसाई यांच्या कारचा अपघात

रितेश देशमुखच्या(ritesh deshmukh) या नव्या चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. प्रेक्षकांमध्ये रितेशच्या नव्या चित्रपटाची उत्सुकता आहे.

हे ही वाचा –  हिंमत उरली असेल तर राजीनामा द्या आणि.., आदित्य ठाकरेंचं आव्हान