Thursday, September 23, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन संग्राम आणि खुशबू लवकरच होणार आई-बाबा

संग्राम आणि खुशबू लवकरच होणार आई-बाबा

Related Story

- Advertisement -

‘देवयानी’ या लोकप्रिय मराठी मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर अढळ स्थान निर्माण करणारा अभिनेता संग्राम साळवी आणि त्याची पत्नी खुशबू तावडे यांनी चाहत्यांना एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. संग्राम आणि खुशबू लवकरचं आई-बाबा होणार आहेत. या आनंदाच्या क्षणाचे काही खास फोटो शेअर करत त्यांनी चाहत्यांसाठी शेअर केले आहेत. या फोटोमध्ये खुशबू बेबी बंप दाखवताना दिसतेय. संग्राम आणि खुशबूने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो पोस्ट करत ते आई-बाबा होणार असल्याची माहिती दिली.

५ सप्टेंबरला खुशबूच्या वाढदिवसानिमित्ताने संग्रामने दोघांचा एक खास फोटो शेअर केला आहे. या फोटोत बेबी बंपमध्ये खुशबूचा क्यूट अंदाज पाहायला मिळतो. यात त्याने खुशबूला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा देत ही आनंदाची बातमी सांगितली. या फोटोसह संग्रामने ‘होणाऱ्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुला त्रास देणारा आता मी एकटाच नाहीय! माझ्या सर्व गुन्ह्यांमध्ये साथ देणाऱ्या चिमुकल्या पार्टनरची आतुरतेने वाट पाहतोय’, असं कॅप्शन दिलंय.

 

View this post on Instagram

 

A post shared by sangram (@sangramsalvi)

- Advertisement -

तर “आमच्या कुटुंबात आणखी प्रेम अॅड करत आहोत” असं कॅप्शन खुशबूने दिलेय. संग्रामच्या या पोस्टवर चाहत्यांसोबतच अनेक मराठी कलाकारांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. तर खुशबूच्या फोटोवर देखील अभिनेत्री अभिज्ञा भावे, मयुरी देशमुख, तेजस्वीनी पंडीत, श्रेया बुगडे आणि सुयश टिळक अशा अनेक कलाकारांनी कमेंट करत शुभेच्छांचा वर्षाव केवा आहे.

- Advertisement -

२०१८ साली खुशबू आणि संग्राम ही जोडी लग्नबंधनात अडकली. संग्रामाने देवयानी या लोकप्रिय मालिकेतून प्रसिद्ध मिळवत आत्तापर्यंत ‘मी तुझीच रे’, ‘आई माझी काळूबाई’ अशा अनेक मालिकांमध्ये काम केले. तर खुशबू तावडे ‘एक मोहोर अबोल’, तू भेटशी नव्याने, पारिजात या मालिकांमध्ये झळकली आहे. तर तारक मेहता का उल्टा चष्मा, प्यार की ये एक कहानी अशा हिंदी मालिकांमध्ये देखील खुशबूने महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.


Ganesh Chaturthi 2021 : बाप्पाला मोदकाचा नैवेद्य का दाखवतात?


 

- Advertisement -