घरमनोरंजनशिवानी बावकरला कोरोनाची लागण

शिवानी बावकरला कोरोनाची लागण

Subscribe

बॉलिवूडप्रमाणे मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार कोरोनाच्या कचाट्यात सापडले आहेत.

राज्यात सध्या कोरोनाचा उद्रेक हा वाढतच चालला आ़हे. अवघी सिनेसृष्टीही कोरोनाच्या विळख्यात अडकली आहे. बॉलिवूडप्रमाणे मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार कोरोनाच्या कचाट्यात सापडले आहेत. मराठी मालिकांमधील कित्येक कलाकारांना एकामागोमाग एक कोरोना झाल्याच्या बातम्या ऐकायला मिळत आहे. यातच आता ‘लागिर झालं जी’ फेम अभिनेत्री शिवानी बावकर हिला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. शिवानीने स्वत: याबाबत एक पोस्ट सोशल मीडियाद्वारे ही माहिती दिली आहे. शिवानीने तिच्या फेसबुक् अकाऊंटवर ही पोस्ट शेअर केली आहे., ”सर्व काळजी आणि खबरदारी घेऊनही, दुर्दैंवाने माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सर्व आवश्यक प्रोटोकॉलचे पालन करत, मी माझ्या डॉक्टरांनी सांगितल्यानुसार औषधोपचार करीत आहे. मी सर्वांना विनंती करते की कृपया खबरदारी घ्या आणि आवश्यक असल्यासच बाहेर पडा. सुरक्षित राहा आणि निरोगी राहा.” असे आवाहन शिवानीने या पोस्टमधून केले आहे.

- Advertisement -

शिवानी बावकरने ‘लागीर झालं जी’ या मालिकेतून पदार्पण केले होते. या मालिकेतील तिच्या ‘शितली’ या भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरुन पसंती दिली होती. मालिका संपल्यानंतरही ती अनेक व्हिडिओ सॉंग्समध्ये पाहायला मिळाली होती. शिवानी सोशल मीडियावरही बरीच अॅक्टिव्ह असते. तिचे ग्लॅमर फोटो ती नेहमीच तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते.


हे वाचा-  देवोलीना भट्टाचार्यने दिशा परमारला विचारली लग्नाची तारीख, दिशा म्हणाली..

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -