घरताज्या घडामोडीसिद्धार्थ मितालीच्या नवीन आयुष्याची सुरुवात, मुंबईत घेतलं स्वत:चं घर

सिद्धार्थ मितालीच्या नवीन आयुष्याची सुरुवात, मुंबईत घेतलं स्वत:चं घर

Subscribe

अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने नुकतंच त्याच्या इंस्टग्रमावर एक फोटो पोस्ट केलाय. यामध्ये तो आणी मिताली एकत्र दिसत आहेत.  दोघांच्याही अंगठ्याला शाई लागल्याच दिसत आहे. दोघांनीही नवीन घराचं डिल फायनल केलंय.

मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय कपल म्हणजे मिताली मयेकर (Mitali mayekar ) आणि सद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar ) दोघांच्याही लव्हस्टोरीबद्दल जाणून घेण्यास चाहते देखील उत्सुक असतात. 2020मध्ये दोघांनी अगदी थाटामाटात केलं. सिद्धार्थ मिताल फक्त सिनेमा किंवा मालिकाच नाही तर त्यांच्या सोशल मीडिया अकांऊटवरूनही अनेकांना सरप्राईज देत असतात. फनी व्हिडिओ, स्पेशल मुमेंट ते चाहत्यांसोबत शेअर करतात. नुकतंच दोघांनी मुंबईत त्यांचं स्वत:चं पहिलं घर खरेदी केलं.  त्यांची ही गुड न्यूज ऐकून त्यांचे चाहते प्रचंड खुश झालेत.

अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने नुकतंच त्याच्या इंस्टग्रमावर एक फोटो पोस्ट केलाय. यामध्ये तो आणी मिताली एकत्र दिसत आहेत.  दोघांच्याही अंगठ्याला शाई लागल्याच दिसत आहे. दोघांनीही नवीन घराचं डिल फायनल केलंय. सिद्धार्थने त्याच्या स्टाईलमध्ये या फोटोला हटके कॅप्शन दिलंय. “एक नीव सुरूवात. मुंबईतील आमचे पहिले घर” यासह त्यांचा “टिनी पांडा हाऊस” हा नेहमीचा व्हायरल हॅशटॅगही वापरलाय. दोघांच्याही आयुष्यात चांगल घडतंय हे पाहून चाहत्यांसह मराठी कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी शुभेच्छांचा वर्षाव केलाय.

- Advertisement -

काही महिन्यापूर्वीच सिद्धार्थ मिताली जंगलसफारी करायला गेले होते. दोघांनाही फिरण्याची प्रचंड आवड आहे. दोघेही लॉंग विकेंड स्पेड करताना दिसतात. नुकतंच त्यांनी कान्ही राष्ट्रीय उद्यानमधल्या भ्रमंतीचे फोटो इंस्टग्रामवर पोस्ट केलेत सिद्धार्थच्या फोटोग्राफीचं अनेकजण कौतुक करतात.

- Advertisement -

सोशल मीडियासह मराठी मनोरंजनसृष्टीत फेमस असणाऱ्या या कपलच्या अनेक अफेअर्सच्या चर्चा रंगल्या होत्या. अनेक दिवस सुरू असलेली चर्चा कालांतराे खरी ठरली आणि व्हॅलेंटाईन डेचं निमित्त साधत दोघांनी सर्वांसमोर प्रेमाची कबूली दिली. मागील वर्षी दोघांनी पुण्याच्या ढेपे वाड्यात पारंपरिक पद्धतीने लग्न केलं. मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार मंडळी त्यांच्या लग्नाला उपस्थित होते.


हेही वाचा – नागा चैतन्यला अनफॉलो केल्यानंतर समंथाची पोस्ट, म्हणाली…

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -