मराठी मनोरंजनसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने एक कौतुकास्पद कामगिरी केली आहे. सिद्धार्थने त्याच्या आईचे दुसरे लग्न लावून दिले असून याबाबतची बातमी त्याने स्वतः त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली आहे.
नुकतीच एक पोस्ट शेअर सिद्धार्थने आईला दुसऱ्या लग्नासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. या पोस्टमध्ये त्याने लिहिलंय की, “Happy Second Innings आई! तुला पण एक जोडीदार हवा, तुझ्या मुलांव्यतिरिक्त एक आयुष्य हवं, तुझं एक स्वतंत्र सुंदर जग हवं, हे कधी लक्षातच नाही आलं गं माझ्या. किती ते एकटं एकटं रहायचं?
View this post on Instagram
तू आत्ता पर्यंत सगळ्यांचा विचार केलास, सगळ्यांसाठी पाय झिजवलेस. आता फक्त तुझा आणि तुझ्या नव्या जोडीदाराचा विचार कर. तुझी पोरं कायम तुझ्या पाठीशी आहेत. तू माझं लग्न थाटात लावलंस, आता मी तुझं लग्न लावतोय. माझ्या आयुष्यातलं अजून एक सुंदर लग्न. माझ्या आईचं! I love you आई! Happy Married Life”, असे सिद्धार्थ चांदेकरने या पोस्टखालील कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. सिद्धार्थच्या या पोस्टला अनेक युजर्स आणि मराठी कलाकार कमेंट्स करुन शुभेच्छा देत आहेत.