Wednesday, May 12, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन 'रंग दे बसंती' फेम अभिनेत्याला भाजपच्या आयटी सेलकडून जीवे मारण्याची धमकी

‘रंग दे बसंती’ फेम अभिनेत्याला भाजपच्या आयटी सेलकडून जीवे मारण्याची धमकी

Related Story

- Advertisement -

‘रंग दे बसंती’ फेम अभिनेता सिद्धार्थला जीवे मारण्याची धमकी देण्यात आलली आहे. अनोळखी नंबरवरुन त्याला शिवीगाळ देखील करण्यात येत आहे. ही धमकी भाजपच्या आयटी सेलकडून देण्यात येत आहे, असा गंभीर आरोप सिद्धार्थने केला आहे. भाजपच्या तामिळनाडू आयटी सेलने त्याचा नंबर लीक केल्याचा दावा सिद्धार्थने केला आहे.

अभिनेता सिद्धार्थने ट्विट करत भाजपच्या आयटी सेलकडून जीवे मारण्याची धमकी येत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. भाजपच्या तामिळनाडू आयटी सेलने त्याचा नंबर लीक केला, असा दावा करताना सिद्धार्थने त्याच्या ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना टॅग केलं आहे. “तामिळनाडूच्या भाजप आयटी सेलनं माझा फोन नंबर लिक केला. मला शिवीगाळ, जीवे मारण्याची, बलात्काराची धमकी देणारे जवळपास ५०० फोन आले. सगळे नंबर आणि रेकॉर्डिंग मी पोलिसांकडे दिले आहेत. मी गप्प बसणार नाही, मी बोलत राहणार,” असं सिद्धार्थने त्याच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

- Advertisement -

- Advertisement -

सिद्धार्थने अजून एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये अभिनेत्याने सुरक्षा पुरवल्याबद्दल पोलिसांचे आभार मानले. तो म्हणाले, “मी नम्रपणे हा विशेषाधिकार सोडून देईन, जेणेकरुन या अधिकाऱ्यांचा या साथीच्या काळात इतरत्रही चांगला वापर होऊ शकेल. पुन्हा धन्यवाद, ”

सिद्धार्थ हा ‘रंग दे बसंती’ या चित्रपटामध्ये आमिर खान सोबत काम केलं आहे.

 

- Advertisement -