रविवारी बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने वांद्रे येथील राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. पण त्याच्या अशा जाण्याने बॉलिवूड आणि टिव्ही इंटस्ट्रीतील कलाकारांनासह चाहत्यांना धक्का बसला आहे. सुशांतच्या आत्महत्याचे कारण अद्यापही अस्पष्टचं आहे. तसेच त्याच्या अशा जाण्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान सुशांतच्या मामांनी सुशांत आत्महत्या करणाऱ्यांपैकी नव्हता त्याची हत्या केली असल्याचा दावा केला आहे. पटना येथील घराबाहेर असताना सुशांतच्या मामांनी हे खळबळजनक वक्तव्य केलं आहे. याबाबत एएनआय वृत्तसंस्थेनं ट्विट केलं आहे.
सुशांतचे मामा एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले की, ‘आम्हाला सुशांतने आत्महत्या केली यावर विश्वास होत नाही आहे. त्यामुळे याप्रकरणी पोलिसांनी अधिक तपासणी करावी. आम्हाला त्याच्या मृत्यूमागे कट रचल्याची शंका आहे.’ सुशांतच्या या आत्महत्या प्रकरणी सीबीआय चौकशी करण्याची मागणी बिहारचे माजी खासदार आणि जन अधिकार पक्षाचे नेते पप्पु यादव देखील केली आहे.
We don’t think he committed suicide, police must investigate the matter. There seems to be a conspiracy behind his death. He has been murdered: Maternal uncle of #SushantSinghRajput, outside Sushant's residence in Patna, Bihar. (14.06.2020) pic.twitter.com/aUO80KNZdf
— ANI (@ANI) June 15, 2020
आज संध्याकाळी ४ वाजता विलेपार्ले स्मशानभूमीत सुशांतच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहे. त्यामुळे सुशांतचे वडील केके सिंह यांसह इतर काही सदस्य मुंबईत दाखल झाले आहेत.
Maharashtra: Forensics team arrives at #SushantSinghRajput's residence in Mumbai. The actor had committed suicide at his residence yesterday.
— ANI (@ANI) June 15, 2020
पाच ते सहा महिन्यांपासून सुशांत मनोचिकित्सकाडून नैराश्यावर उपचार घेत होता. शनिवारी रात्री त्याला अधिक त्रास झाला. त्यामुळे रविवारी दुपारी त्याने राहत्या घरी हिरव्या रंगाच्या कुर्ताने गळफास लावून आत्महत्या केल्याची प्राथमिक अंदाजात स्पष्ट झाले आहे.
हेही वाचा – सुशांतच्या मृतदेहाचे फोटो व्हायरल; महाराष्ट्र सायबर सेलने दिला कारवाईचा इशारा