घरमनोरंजनस्वप्नील जोशीचा ‘बळी’ चित्रपट लवकरच प्रदर्शित

स्वप्नील जोशीचा ‘बळी’ चित्रपट लवकरच प्रदर्शित

Subscribe

हा चित्रपट १६ एप्रिल २०२१ रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.

बळी’ या चित्रपटाच्या मोशन पोस्टरचे अनावरण ४ मार्च २०२१ रोजी करण्यात आले. प्रसिद्ध झालेल्या मोशन पोस्टरमध्ये एका व्यक्तींचा भीतीदायक चेहरा रक्त आणि डोळ्यांत क्रॉसच्या प्रतिमांचा वातावरण दर्शविले गेले आहे. हे भीतीदायक पटकथेची जाणीव देते. एलिझाबेथ कोण आहे? च्या टॅग लाइनसह , त्यातून अघटीत आणि भीतीपूर्ण वातावरण दाखवण्यात आले आहे. त्यातून या चित्रपटाची कथा आणि पटकथा भीतीदायक असेल, याची कल्पना येते आणि त्यातून प्रेक्षकांना काही धडकी भरवणारे प्रसंग पडद्यावर अनुभवता येतील याची खुणगाठ बांधता येते. अभिनेत्री स्वप्नील जोशी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट १६ एप्रिल २०२१ रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.

- Advertisement -

‘बळी’ या हॉरर चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल फुरिया यांनी केले आहे. अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार प्रस्तुतकर्ता आणि जीसिम्सची यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तसेच अभिनेत्री स्वप्नील जोशी हा या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाबाबत स्वप्नील जोशी म्हणाला की, जर तुम्ही थोडेसा मागे जाऊन विचार केलात तर तुमच्या लक्षात येईल की मराठी चित्रपट क्षेत्राने ‘लपाछपी’च्या आधी कधीही हॉरर चित्रपटाचा प्रयोग केलेला नाही. हॉरर विनोदी चित्रपटांचे प्रयोग झाले, पण तुमची झोप उडवेल असा मराठी चित्रपट झाला नाही. मला वाटते ‘बळी’ ती पोकळी नक्कीच भरून काढेल. त्यापेक्षाही अधिक महत्वाचे म्हणजे चित्रपटाची कथा तुम्हाला घाबरवून टाकते. नेहमी ज्याप्रमाणे भारतीय हॉरर चित्रपटांमध्ये होते तसे भडक संगीत आणि उड्या मारून भीती निर्माण करण्याचा प्रकार येथे नाही.

विशाल फुरिया यांचा ‘लपाछपी’ हा तीन वर्षांपूर्वी गाजलेला थ्रिलर चित्रपट आहे. या यशाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या ‘बळी’ या नवीन हॉरर चित्रपटाची प्रतीक्षा सर्वांनाच लागली आहे. या हॉरर मराठी चित्रपटाचा मोठ्या प्रमाणावर बोलबाला असून स्वप्नील जोशीच्या चाहत्यांना या चित्रपटाची उत्सुकता आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Nawab No 2! चिमुकल्यासह करिनाने शेअर केला फोटो; नेटिझन्स म्हणाले…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -