‘विठ्ठलाचा टिळा आणि गुगल मॅप्स अनोखं कनेक्शन’, ज्ञानेश्वर माऊली साकारणाऱ्या अभिनेत्याची ‘ती’ पोस्ट चर्चेत

आषाढी एकादशी निमित्ताने नुकतंच अभिनेता वरूण भागवत याने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्ट मध्ये त्याने विठुरायाचं आणि गुगल मॅपचे एक वेगळं कनेक्शन अधोरेखित केले आहे.

‘विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल’ विठ्ठल नामाचा जयघोष करत आषाढी एकादशीचा सोहळा मोठया उत्सहात आणि आनंदात पार पडला. गेली दोन वर्षे आषाढी वारी होऊ शकली नव्हती पण यावर्षी मात्र आषाढी वारी पायी झाल्याने वारकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. आषाढी एकादशीच्या दिवशी राज्यभरच सोहळ्याचा आनंद दिसत होता. आषाढी एकादशी निमित्ताने नुकतंच अभिनेता वरूण भागवत याने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्ट मध्ये त्याने विठुरायाचं आणि गुगल मॅपचे एक वेगळं कनेक्शन अधोरेखित केले आहे.

हे ही वाचा –  ‘मी पुन्हा येईन’ वेबसीरिजमध्ये भारत गणेशपुरेंची दमदार एन्ट्री

 

View this post on Instagram

 

A post shared by Varun Bhagwat (@varunbhagwatofficial)

मराठी अभिनेता वरुण भागवत हा इंस्टाग्रामवर बराच सक्रिय असतो. सध्या वरुण ‘ज्ञानेश्वर माउली’ या मराठी मालिकेत श्री संत ज्ञानेश्वर यांची मुख्य भूमिका साकारतो आहे. वरुणने काल आषाढी एकादशीच्या निमित्ताने एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने विठ्ठलाच्या कपाळावर असलेल्या टिळ्याचे आणि रास्ता दाखविणाऱ्या गुगल मॅपचं आगळं वेगळं नातं अधोरेखित केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Varun Bhagwat (@varunbhagwatofficial)

हे ही वाचा – सोनालीच्या मनमोहक अदा, साडी आणि नथीवरचे फोटो पाहून चाहते घायाळ

अभिनेता वरुण भागवत त्याच्या इंस्टाग्रामवरच्या पोस्ट मध्ये लिहितो,
पांडुरंग आणि Google maps.

कधी पाहिलंय का की पांडुरंगाचा टिळा आणि Google maps च्या app चा symbol हा जवळजवळ सारखा आहे. मी निरीक्षण करत बसलो आणि लक्षात आलं की बरोबर. दोघेही final destination सांगतात. Google map आपल्याला इप्सित स्थळी पोहोचवतो आणि पांडुरंगाचा तो टिळा (नाम) हे दर्शवतो की इथे पोहोचायचय.

Google map रस्ता दाखवतो. पांडुरंग मात्र म्हणतो की रस्ता तुम्ही शोधा. तिथपर्यंत पोहोचण्याचं गमक तो सांगतो. प्रत्येकाचे रस्ते भिन्न असतील. प्रत्येकाच्या रस्त्यात मधे मधे सतत stops लागतील. त्या stops चं नाव असेल कर्म. एका कर्माची रेषा हिरवी तर दुसऱ्याची लाल असेल. हिरवा रंग म्हणजे चांगलं कर्म. लाल म्हणजे कुकर्म. हिरवं कर्म निवडायचं यासाठीची बुध्दी पांडुरंग आपल्याला देतो, ती वापरायचं काम आपलं. नाहीतर लाल रंगाच्या कर्माच्या traffic jam मधे आपण फसतो आणि काही केल्या त्यातून बाहेर पडता येत नाही. Choice आपल्या हातात दिलाय. योग्य निवड करत जात राहायचं.

रस्ता कधी कच्चा असतो, कधी पक्का.
कधी चढ तर कधी उतार.
कधी खड्डे तर कधी एकदम सुबक रस्ता.
कधी सरळ तर कधी वळणावळणाचा रस्ता.
कधी first gear तर कधी मस्त fifth gear वर जाता येईल.

कधी आपण रस्त्याचा हात पकडू, कधी तो आपला हात पकडेल, अर्थात कधी आयुष्य आपल्याला नेत राहील, कधी आपण आयुष्याला सांगू, चल आज या दिशेने जाऊ.

ज्याप्रमाणे रस्त्यात कधी गाडी बदलावी लागते त्याप्रमाणे आयुष्यात वेगवेगळे निर्णय घ्यावे लागतात.

कधी पायी चालावं लागतं त्याप्रमाणे जीवनात खडतर मार्ग अवलंबावा लागतो.

या जगात आपण सारेच मुसाफिर. भटकत असतो. रस्ता असतो. चालत राहतो. हवेसंग डोलत असतो. प्रवास आहे. आनंद घेत असतो. आनंद घेत नाही आहोत असं जाणवत असेल तर क्षणभर थांबून एकदा विचार करायचा आणि स्वतःला विचारायचं की प्रवासात मजा येते आहे ना?

कारण नीट विचार केला की कळतं की इथे destination महत्त्वाचं आहे पण प्रवास जास्त महत्त्वाचा आहे. प्रवास उत्तम करायचा आहे. ऊन, सावली, पाऊस, वारा सगळं लागणार आहेच. पण आयुष्याची वारी अथक पूर्ण करायची. तिही शक्य तिथे, शक्य तेव्हा, शक्य तेवढा, शक्य तेवढ्या साऱ्यांना आनंद देत.

कारण माउलींनी म्हटलंच आहे,

अवघाचि संसार सुखाचा करीन |
आनंदें भरीन तिन्ही लोक ||
जाईन गे माये तया पंढरपुरा |
भेटेन माहेरा आपुलिया ||

Destination तर set आहे. प्रवास उत्तम आणि आनंदी करणं आपल्याच हाती.

ही पोस्ट वाचून वाचकांच्या मनातही भक्तीभाव निर्माण झालाय शिवाय राहत नाही. दरम्यान ‘ज्ञानेश्वर माउली’ ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या मालिकेला आणि वरुण भागवत याच्या भूमिकेला सुद्धा प्रेक्षक उत्तम प्रतिसाद देत आहेत.

हे ही वाचा –  ‘जिवाभावाची साथ लाभली ती म्हणजे सलमान भाऊ यांची’, अभिनेता रितेश देशमुखचं दिग्दर्शनात…