‘तितली’मध्ये अभिनेता वत्सल सेठ दिसणार महत्वपूर्ण भूमिकेत

स्टारप्लस आपल्या प्रेक्षकांसाठी ‘तितली’ नावाची एक अनोखी आणि यापूर्वी कधीही न पाहिलेली प्रेमकथा घेऊन येत आहे. ही कथा आपल्या मनातील प्रेम या संकल्पनेचाच पुनर्विचार करायला लावते की, खरंच प्रेम असं असतं का? नेहा सोलंकी तितलीच्या शीर्षक भूमिकेत असून तिच्या समोर मुख्य भूमिकेत अविनाश मिश्रा असणार आहे, जो गर्वची भूमिका साकारत आहे. तितली ही एक वेधक प्रेमकथा आहे ज्यामध्ये तितली नावाची आनंदी, नटखट मुलगी तिच्या स्वप्नांचा राजकुमार शोधते आहे. परिकथेतील स्वप्नांप्रमाणे ती आपले आयुष्य गुलाबी करण्याच्या प्रयत्नांत आहे.

तितली मालिकेच्या निमित्ताने वत्सल सेठ छोट्या पड्यावर परतत आहे. यामध्ये वत्सल राहुलची भूमिका साकारत असून राहुल सद्ध्या दुबईत रहात आहे. तितली आणि राहुल एकाच शाळेत शिकत होते जिथे राहुल तिला सिनियर होता. राहुल पहिल्याच नजरेत तितलीच्या प्रेमात पडतो. राहुलचे पात्र आकर्षक, मजेदार आणि कौटुंबिक जिव्हाळ्याचे असले तरीही एक खोल गुपित राहुलने लपवून ठेवले आहे.

Vatsal Sheth B'day Spl: वत्सल सेठ की डेब्यू फिल्म हिट रही, फिर भी बॉलीवुड  में नहीं जमा पाए अपना सिक्का | Happy Birtday Vatsal Seth debut film was a  hit yet he

यावर बोलताना वत्सल सेठ म्हणाला की, “एक अभिनेता म्हणून मला नेहमीच काहीतरी रोमांचक आणि आव्हानात्मक करायचं असतं. ‘तितली’ मधील राहुल हे एक महत्त्वाचे पात्र आहे. मी तितलीमध्ये करत असलेल्या कॅमिओबद्दल खूप उत्सुक आहे. राहुलसारखी व्यक्तिरेखा मी या पूर्वी कधीही साकारलेली नाही. राहुल धोकेबाज आहे. ते म्हणतात ना, ‘डोंट जज द बुक बाय इट्स कवर’, ते राहुलवर अगदी चपखल बसते. राहुलला खूप चढ-उतारांचा सामना करावा लागला आहे, त्याला माहित आहे की तो तितलीसोबत जे करतोय ते योग्य नाही. पण आपले ईप्सित साध्य करण्यासाठी त्याला तो मार्ग अवलंबावा लागतो. ‘तितली’मध्ये काम करणे हा एक विलक्षण अनुभव होता. स्टार प्लस हे काम करण्यासाठी सर्वोत्तम चॅनल आहे. यातील कलाकार आणि क्रू सोबत काम करण्याचा अनुभव अनोखा होता. तितलीची व्यक्तिरेखा साकारणारी नेहा सोलंकी ही एक उत्तम अभिनेत्री आहे. गुजराती भाषा माहीत नसतानाही नेहाने स्वतःला तितलीच्या भूमिकेत सिद्ध केले आहे. तिच्यासाठी ही मालिका आवर्जून पहावी.”


हेही वाचा :

कान्समधील लूकवरून ऐश्वर्या ट्रोल, जादू बरोबर तुलना