Saturday, June 3, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी 'ती परत आलीये' म्हणत अनेक वर्षांनी अभिनेते विजय कदम प्रेक्षकांच्या भेटीला

‘ती परत आलीये’ म्हणत अनेक वर्षांनी अभिनेते विजय कदम प्रेक्षकांच्या भेटीला

Subscribe

विजय कदम हे या मालिकेत बाबुराव तांडेल नावाची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहेत.


एकेकाळी आपल्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे ज्येष्ठ अभिनेते विजय कदम हे अनेक वर्षांनी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. ती परत आलीये असे म्हणत विजय कदम यांनी मालिकेच्या छोट्या पडद्यावर दमदार एंट्री केली आहे. झी मराठीवरील ‘ती परत आलीये’ मालिकेचा प्रोमो काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला. (actor Vijay Kadam come back on marathi Industry on ti parat aaliye marathi serial)
प्रोमो पाहून अनेकांना धडकी भरली. मालिका हॉरर असली तरी मालिकेत नक्की काय पहायला मिळणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. विजय कदम हे या मालिकेत बाबुराव तांडेल नावाची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहेत. विजय कदम यांनी मालिकेतील त्यांच्या भुमिकेविषयी एका मुलाखतीत सांगितले. अनेक वर्षांनी मालिकेत काम करण्याची संधी मिळाल्याने त्यांनी अनेकांचे आभार देखील मानले.

 

View this post on Instagram

 

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

- Advertisement -

एका मुलाखतीत विजय कदम यांनी त्यांच्या भूमिकेविषेयी सांगितले, ही मालिका माझ्यासाठी फार महत्त्वाची आहे. अशाप्रकारची वेगळ्या धाटणीची भूमिका करण्याची माझी फार पूर्वीपासून इच्छा होती. आता मला ही भूमिका साकारायला मिळतेय त्यामुळे मला फार आनंद होत असल्याचे त्यांनी सांगितले. मला या भूमिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहचायचे आहे. विजय कदम हा मालिकेत विजय कदम दिसता कामा नये तो वेगळा दिसला पाहिजे त्यासाठी मी प्रयत्न करत आहे असेही ते म्हणाले.

बाबुराव या पात्राविषयी विजय कदम यांना विचारले असता त्यांनी फार छान वर्णन केले. मालिकेत बाबुराव हा एक कोकणी माणूस आहे. ऐरवी तो सगळ्यांना शूर असल्याचे सांगतो मात्र पायाखालून उंदीर जरी गेला तरी तो घाबरतो. हे पात्र नक्कीच प्रेक्षकांचे मनोरंजन करेल. पुढे विजय कदम यांनी म्हटले की, मी आतापर्यंत अनेक भयपट पाहिले आहेत. त्यात मला काम करायचे होते.मात्र या मालिकेच्या निमित्ताने माझी ही इच्छा पूर्ण झाली. मालिकेची संपर्ण गोष्ट माझ्या भोवती फिरतेय त्यामुळे मला हे पात्र साकारण्यात फार मज्जा येते.


- Advertisement -

हेही वाचा – ‘May You All Safar’ यशराज मुखातेचा नवीन मॅशअप व्हिडिओ व्हायरल

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -