Wednesday, July 28, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मनोरंजन ‘जय भवानी जय शिवाजी’ मालिकेत अभिनेता विशाल निकम दिसणार शिवा कशिदच्या भूमिकेत

‘जय भवानी जय शिवाजी’ मालिकेत अभिनेता विशाल निकम दिसणार शिवा कशिदच्या भूमिकेत

शिलेदारांच्या शौर्याची गोष्ट सांगणारी ‘जय भवानी जय शिवाजी’ मालिका २६ जुलैपासून रात्री 10 वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

Related Story

- Advertisement -

अखंड महाराष्ट्राचे दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्यगाथेवर आधारीत मालिका स्टार प्रवाहवर लवकर प्रसारित होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे नाव जरी उच्चारलं तरी उर अभिमानाने भरुन येतो. रयतेचा राजा कसा असावा याचा पायंडा छत्रपती शिवरायांनी रचला आणि या जाणत्या राजाच्या स्वराज्य स्थापनेच्या स्वप्नपूर्ततेसाठी हजारो शिलेदारांनी जीव ओवाळून टाकला. याच शिलेदारांच्या शौर्याची गोष्ट सांगणारी ‘जय भवानी जय शिवाजी’ मालिका २६ जुलैपासून रात्री 10 वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या मालिकेचा प्रोमो रिलीज होताच प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे. आता सर्वानांच मालिका कधी प्रसारीत होणार याची ऊत्सुकता लागून राहिली आहे. इतकचं नाही तर मालिकेत महाराजांच्या भूमिकेत अभिनेता भूषण प्रधान झळकणार असून त्या सोबतच दिग्गज अभिनेते अजिंक्य देव यांनी बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारणार आहेत. नेताजी पालकरची भूमिका साकारण्याची संधी अभिनेता कश्यप परुळेकर याला मिळणार आहे. या अभुतपुर्व इतिहासाची झलक एका मालिकेच्या स्वरुपात पाहणे हे चाहत्यांसाठी महत्वपुर्ण ठरणार आहे. तसेच मालिकेमध्ये प्रसिध्द अभिनेता विशाल निकम ‘जय भवानी जय शिवाजी’ मालिकेमध्ये शिवा काशिद यांची भूमिका साकारणार असल्याचं समजलं आहे. विशाल निकम याचा लुक सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.(Actor Vishal Nikam will be seen in the role of Shiva Kashid in the series ‘Jai Bhavani Jai Shivaji’)

 

View this post on Instagram

 

A post shared by VISHHAL NIKAM (@vishhalnikam)

- Advertisement -

 

विशाल निकमने यापुर्वी ‘दक्खनचा राजा जोतीबा’ या मालिकेत काम केलं होतं. या मालिकेचं चित्रीकरण कोल्हापूरच्या चित्रनगरीमध्ये करण्यात आलं होतं तसेच मालिकेतील जोतीबा देवाच्या भुमिकेसाठी विशालने प्रचंड मेहनत घेत प्रेक्षकांच्या कसोटीस खरा उतरला होता. आत्ता पुन्हा एकदा अशाच ऐतिहासिक मालिकेमध्ये तो महाराजांचा शिलेदार शिवा काशिद यांची भूमिका साकारताना दिसणार आहे.ही मालिका येत्या 26 जुलैपासून स्टार प्रवाहवर प्रसारित होणार आहे.


- Advertisement -

हे हि वाचा- भूषण कुमारने फेटाळले बलात्काराचे आरोप, दिलं स्पष्टीकरण

- Advertisement -