‘मुन्नाभाई M.B.B.S.’चा हा हिरो ३ वर्षांपासून गायब

तीन वर्षांपूर्वी घरातून बाहेर पडतेवेळी विशालने त्याच्या आईकडून ५०० रुपये घेतले होते. त्यावेळी घरातून बाहेर पडलेला विशाल आजपर्यंत घरी परतलेलाच नाही.

Actor Vishal Thakkar from Munna Bhai M.B.B.S missing from 2016
संजूबाबा आणि अर्शद वारसी यांचा ‘मुन्नाभाई एसबीबीएस’ हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. 

उपलब्ध माहितीनुसार, ३१ डिसेंबर २०१५ च्या रात्री न्यू ईयर पार्टीसाठी विशाल घराबाहेर पडला होता. यावेळी त्याने आईलाही सोबत येण्यास सांगितलं होतं. मात्र, आईने नकार दिल्यामुळे तिच्याकडून ५०० रुपये घेऊन विशाल एकटाच निघून गेला. त्या रात्री १२ वाजता त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून नवीन वर्षाच्या शुभेच्छाही दिल्या. मात्र, दुसऱ्या दिवशी म्हणजेच १ जानेवारी २०१६ पासून विशालशी संपर्क पूर्णतपणे तुटला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ जानेवारीला सकाळी ११.४५ वाजता विशालला त्याच्या गर्लफ्रेंडसोबत घोडबंदर परिसरात शेवटचं पाहण्यात आलं होतं. याप्रकरणी विशालच्या गर्लफ्रेंडची चौकशी केली असता, विशाल मला भेटून शूटसाठी रवाना झाल्याचे तिने सांगितले. बेपत्ता होण्यापूर्वी विशालने ‘टँगो चार्ली’ या चित्रपटात आणि ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेमध्ये काम केलं होतं.

विशालने दिलेल्या अखेरच्या शुभेच्छा