Friday, February 19, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी यामुळे अभिनेता विवेक ओबेरॉयविरोधात केली दंडात्मक कारवाई

यामुळे अभिनेता विवेक ओबेरॉयविरोधात केली दंडात्मक कारवाई

Related Story

- Advertisement -

विना हेल्मेट, विना मास्क मोटारसायकल चालवल्याप्रकरणी अभिनेता विवेक ओबेरॉय याला मुंबई वाहतूक पोलिसांनी ५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. विवेक ओबेरॉय हा आपल्या एका मैत्रिणीसोबत मुंबईतील रस्त्यावर विना हेल्मेट मोटारसायकल चालवत असल्याचा व्हिडियो समाज सेवक बिनु वर्गीस यांनी ट्विट केला होता. त्यानंतर सांताक्रूझ वाहतूक विभागाने ही कारवाई केली आहे.

मुंबईतील पश्चिम उपनगरात सांताक्रूझ परिसरात अभिनेता विवेक ओबेरॉय हा आपल्या एका मैत्रिणीला मोटारसायकलवर डबल सीट बसवून विना हेल्मेट, विना मास्क चालवत असल्याचा व्हिडिओ ट्विटर या समाज माध्यमावर व्हायरल करण्यात आला होता. या व्हिडियोत विवेक ओबोरॉय हा मोटारसायकल चालवत एका पेट्रोल पंपावर आला आणि त्याने त्याच्या अनेक चाहत्यांसोबत सेल्फी देखील काढत असल्याचे दिसून येत आहे. त्यावेळी त्याने तोंडाला मास्क लावलेले नव्हते तसेच विना हेल्मेट मोटारसायकल चालवत असल्याचे समाजसेवक बिनु वर्गीस यांनी मुमबी वाहतूक पोलिसांच्या ट्विटरच्या माध्यमातून लक्षात आणून दिले. मुंबई वाहतूक विभागाच्या सांताक्रूझ वाहतूक पोलिसांनी या व्हिडियोवरून विवेक ओबोरॉय याचे विना हेल्मेट मोटारसायकल चालवून वाहतुकीच्या नियम न पाळले म्हणून ५०० रुपयांचा ई-चलनाद्वारे दंड आकारला आहे.


- Advertisement -

हेही वाचा – रोमँटिक ‘माशुका’ हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीस


 

- Advertisement -