घरमनोरंजनमराठीतल्या मोगलीची 'खिचीक गोष्ट'!

मराठीतल्या मोगलीची ‘खिचीक गोष्ट’!

Subscribe

आपण सगळ्यांनी हिंदीतला मोगली पाहिला असेल.. पण आता मराठीतही मोगली प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. मूळचा परभणीचा असलेला यश वडिलांच्या बिझनेसमुळे पुण्यात वाढला. लहानपणापासूनच त्याला अभिनयाची आवड. गणपतीमध्ये नक्कल करणं असो किंवा चित्रपटातले संवाद हुबेहुब म्हणून दाखवणं असो. यशने सगळ्यांची मन जिंकली. अभिनयासोबत नृत्याचीही आवड असलेल्या यशने डान्स क्लासमध्येही उत्तम प्रतिसाद मिळवला. त्याच्या आई-वडिलांनी त्याला खूप मेहनतीने घडवलं आहे.

मोगली साकारताना….

हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. यश साकारत असलेलं फटफटी नावाचं पात्र हे पारधी समाजातील एका लहान मुलाचं पात्र आहे. जो अतिशय खोडकर आहे आणि दिसायला थेट मोगलीसारखा आहे. त्याचं जीवनही बरंचसं मोगलीसारखंच आहे. जंगलात राहणं, मासोळ्या पकडणं आणि दिवसभर धुडगूस घालणं असे उद्योग हा फटफटी करतो. एक दिवस त्याच्या आयुष्यात एक खिचिक घटना घडते. मग नेमकं काय होतं. त्यातून या व्यक्तिरेखेचा प्रवास प्रितम पाटील यांनी उलगडला आहे. हे पात्र साकारण्यासाठी खूप मेहनत घेणं गरजेचं होतं. पण, प्रयत्नांची कोणतीही कसर यशने सोडली नाही. गुबगुबीत देहाच्या यशने या भूमिकेसाठी चक्क दहा किलो वजनही कमी केलं. पारधी समाजाची भाषा, त्यांचं जीवन, देहबोली हे सगळं काही तो अवघ्या चार महिन्यात शिकला.

- Advertisement -

प्रीतम एस. के. पाटील यांनी या चित्रपटाचे लेखन दिग्दर्शन केले आहे. नात्यांची अनोखी कथा या चित्रपटात आपल्याला पहायला मिळणार असून रसिक प्रेक्षकांना सहकुटुंब या चित्रपटाचा आनंद घेता येणार आहे.अभिनेता सिद्धार्थ जाधव, प्रथमेश परब, सुदेश बेरी, अनिल धकाते, शिल्पा ठाकरे, अभिनेत्री पॉला मॅकगिलीन, शीतल ढाकणे, रसिका चव्हाण, यश खोंड आदी कलाकारांचा अभिनय आपल्याला या चित्रपटात पहायला मिळणार आहेत. खिचिक हे नाव अनोखं आहे, त्यामुळे प्रेक्षकांची चित्रपटाबाबती उत्सुकता कमालीची वाढली आहे. येत्या २० सप्टेंबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -