अभिनेत्री उर्मिलाच्या बाळाची पहिली झलक पाहिलीत का?

उर्मिला आणि सुकिर्त त्यांच्या बाळाला सध्या हिरो, गोंडस, गोंडू,ढंप्या अशा विविध नावांनी हाक मारतात.

Actor youtuber urmila nimbalkar share baby's first photo
अभिनेत्री उर्मिलाच्या बाळाची पहिली झलक पाहिलात का?

अभिनेत्री,यूट्यूबर उर्मिला निंबाळकरने (urmila nimbalkar )  एका गोंडस बाळाला जन्म दिला. अभिनय तसेच आपल्या लाघवी स्वभावाने प्रेक्षकांची आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरुन अनेक युझर्सच्या मनात हक्काचं स्थान मिळवणारी उर्मिला आई झाल्यानंतर चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. तिच्या बाळाची पहिली झलक पाहण्यासाठी चाहते प्रचंड आतुर होते. उर्मिलाने चाहत्यांची इच्छा पूर्ण करत तिच्या यूट्यूब चॅनेलवरुन बाळाच्या जन्मपासूनचा तिचा संपूर्ण प्रवासाचा अनुभव सांगत ‘हिरोची एंट्री’ असे म्हणत बाळाची पहिली झलक दाखवली. (Actor youtuber urmila nimbalkar share baby’s first photo)

उर्मिला आई झाल्यानंतर तिचे अनेक अनुभव शेअर करत होती मात्र बाळाचा चेहरा पाहण्यासाठी चाहते वाट पाहत होते. उर्मिला आणि तिचा नवरा सुकिर्त यांनी मिळून त्यांच्या बाळाची व्हिडिओतून ओळख करुन दिली. दोघांनीही बाळाचे फोटोशुट केले. फोटोशूटनंतरचे बाळाचे क्यूट फोटो उर्मिलाने शेअर केले आहेत. पुण्यातील एका प्रसिद्ध फोटोग्राफरकडून उर्मिला आपल्या बाळाचे फोटोशूट केले.

उर्मिलाने बाळाची पहिली झलक तर दाखवली मात्र बाळाचे नाव काय ठेवले हे सांगितले नाही. याविषयी उर्मिला म्हणाली, ‘आम्ही काही नावे सिलेक्ट केली आहेत. त्यातील एक नाव आम्ही लवकरच आमच्या बाळाला देऊ.’ उर्मिला आणि सुकिर्त त्यांच्या बाळाला सध्या हिरो, गोंडस, गोंडू,ढंप्या अशा विविध नावांनी हाक मारतात.

‘उर्मिला आणि गोंडस बाळ! मला कधी कधी विश्वास बसत नाही ही गुंडाळलेली अळी ही एक बरीटो, माझा आहे’,असे म्हणत बाळाचा पहिला फोटो उर्मिलाने शेअर केला होता.


हेही वाचा – Meenakshi Sundareshwar: दिवाळीत करण जोहरचा ‘मीनाक्षी सुंदरेश्वर’ चित्रपट भेटीला