Friday, June 18, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी 3 Idiots मध्ये 'या' सीनसाठी आमिर,शर्मन,आर माधवन खरचं प्यायले होते दारु

3 Idiots मध्ये ‘या’ सीनसाठी आमिर,शर्मन,आर माधवन खरचं प्यायले होते दारु

आम्ही सीनसाठी उभे राहिलो तेव्हा आम्ही पूर्णपणे नशेत होतो.

Related Story

- Advertisement -

बॉलिवूडच्या सदाबहार सिनेमांपैकी एक सिनेमा म्हणजे थ्री इडियट्स (3 Idiots) या सिनेमाने केवळ बॉक्स ऑफिसवरच गल्ला जमवला नाही तर प्रेक्षकांच्या मनातही कायमचे घर केले आहे. त्यावेळच्या स्टँडआऊट सिनेमांपैकी थ्री इडियट्स हा सिनेमा होता. आजही प्रेक्षक हा सिनेमा आवर्जुन पाहतात. अभिनेता आमिर खान (Aamir Khan) शर्मन जोशी (Sharman josh) आणि आर माधवन (R Madhavan ) हे कलाकार थ्री इडियट्सच्या महत्त्वाच्या भूमिकेत होते. सिनेमातील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. सिनेमातील राजू,रेंचो आणि फरहान म्हणजेच आमिर खान,शर्मन जोशी आणि आर माधवन हे दारु प्यायला बसलेला सीन सर्वांच्याच लक्षात असेल. सिनेमातील या सीन विषयी अभिनेता शर्मन जोशी याने मोठा खुलासा केला आहे. ज्याने प्रेक्षकही चकीत झाले आहेत. (Actors Aamir Khan, Sharman joshi and R Madhavan were really drunk during the scene in the movie 3 Idiots)

अभिनेता शर्मन जोशी याने एका इंग्रजी वेबसाइटला दिलेल्या मुलाखती असे म्हटले आहे की, मला सिनेमातील तो सीन अजूनही आठवतो, जेव्हा आमिर,मॅडी आणि मी नशेत असतो आणि आम्ही बोमन इराणीला शाप देतो. या सीनवेळी आम्ही खरोखर नशेत होतो. ही कल्पना अभिनेता आमिर खानची होती. या सीनसाठी आम्ही खरच दारू प्यावी असे त्याला वाटले,असा खुलासा शर्मनने केला आहे.

- Advertisement -

शर्मन जोशीने पुढे असेही म्हटले की, मी आणि आमिर वेळेत प्यायला बसलो. मात्र मॅडी आमच्यात नव्हता. मॅडी दारु पित नाही. पण तरीही त्याने आमच्या सोबत बसून आमचे समर्थन केले. आम्ही सीनसाठी उभे राहिलो तेव्हा आम्ही पूर्णपणे नशेत होतो. मॅडीने अजिबात दारु प्यायली नव्हती तरीही त्याने तो सीन आमच्यापेक्षा सुंदर वटवला. २००९ मध्ये प्रदर्शित झालेला थ्री इडियट्स हा सिनेमा केवळ भारतातील सिनेमागृहातच नाही तर परदेशातही प्रदर्शित करण्यात आला होता. परदेशातही सिनेमाला उत्तम प्रतिसाद मिळाला होता. या सिनेमाने तीन पुरस्कारही पटकावले.


हेही वाचा – ‘ख्वाबों के परिंदे’ मधून उलघडणार जीवाभावाच्या मैत्रीचे पैलू

- Advertisement -