Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन 'आदिपुरुष' चित्रपटाला 'रामायण' मालिकेतील कलाकारांचा आक्षेप

‘आदिपुरुष’ चित्रपटाला ‘रामायण’ मालिकेतील कलाकारांचा आक्षेप

Subscribe

90 च्या दशकात रामानंद सागर यांच्या हिंदी टेलिव्हिजनवरील 'रामायण' मालिकेत सीता ही भूमिका साकारणारी अभिनेत्री दीपिका चिखलिया आणि लक्ष्मण ही भूमिका साकारणारा अभिनेता सुनील लहरी यांनी आपलं मत मांडलं आहे.

टॉलिवूडचा सुपरस्टार प्रभास सध्या त्याच्या ‘आदिपुरूष’ चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. तेव्हापासून प्रभासच्या ‘आदिपुरूष’ चित्रपटाला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जात आहे. तसेच या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी देखील केली जात आहे. ज्यामुळे आता चित्रपटाच्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांना समस्येचा सामना करावा लागत आहे. सामान्य व्यक्तिंपासून ते अनेक राजकीय नेत्यांपर्यंत या चित्रपटावर नाराजी व्यक्त केली जात आहे. दरम्यान, आता 90 च्या दशकात रामानंद सागर यांच्या हिंदी टेलिव्हिजनवरील ‘रामायण’ मालिकेत सीता ही भूमिका साकारणारी अभिनेत्री दीपिका चिखलिया आणि लक्ष्मण ही भूमिका साकारणारा अभिनेता सुनील लहरी यांनी आपलं मत मांडलं आहे.

दीपिका चिखलिया मांडलं मत
प्रभास आणि कृति सेननच्या ‘आदिपुरुष’चा टीझर व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक वाद सुरू झाले आहेत. आता या वादात राजकीय पक्षांनी देखील उडी घेतली आहे. दरम्यान, आता 90 च्या दशकात रामानंद सागर यांच्या हिंदी टेलिव्हिजनवरील ‘रामायण’ मालिकेत सीता ही भूमिका साकारणारी अभिनेत्री दीपिका चिखलिया यांनी आपलं मत मांडलं आहे. एका वृत्तवाहिनी सोबत संवाद साधताना त्यांनी चित्रपटामध्ये करण्यात आलेल्या वीएफएक्स वर प्रश्न उपस्थित केला आहे. त्यानंतर रावणाच्या लूक बाबत म्हणाल्या की, “ते श्रीलंकेचे आहेत असं वाटायला हवं, मुगलांसारखे नाही. आपल्या धर्मासोबत आणि देवांसोबत मस्करी करू नका. रामायण भक्तिचे संविधान आहे. यामुळे शिकवण मिळते, त्यामुळे त्याची बदनामी चुकूनही करू नका”

- Advertisement -

सुनील लहरी म्हणाले की
‘रामायण’ मालिकेत लक्ष्मण ही भूमिका साकारणारा अभिनेता सुनील लहरी यांना देखील चित्रपटाचे टीझर आवडलं नाही. त्यांनी रावणाच्या भूमिकेसाठी सोनू सूद असायला हवा होत असं म्हटलं तर अजय देवगण राम आणि ऋतिकला लक्ष्मण ही भूमिका द्यायला हवी. असं म्हटलं आहे.


हेही वाचा :

‘आदिपुरुष’ मधील हनुमानाच्या लूकवर नेटकरी संतापले

- Advertisement -
- Advertisement -
shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -