Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन 'मुन्नाभाई MBBS 3' चित्रपटाबाबत अभिनेता Sanjay Dutt आणि Arshad Warsi ने दिली...

‘मुन्नाभाई MBBS 3’ चित्रपटाबाबत अभिनेता Sanjay Dutt आणि Arshad Warsi ने दिली ही प्रतिक्रिया

Subscribe

2003 साली प्रदर्शित झालेला ‘मुन्ना भाई MBBS’ चित्रपट आजही प्रेक्षक मोठ्या आवडीने पाहतात. ‘मुन्ना भाई MBBS’ नंतर 2006 साली या चित्रपटाचा दुसरा सीक्वेल ‘लगे रहो मुन्ना भाई’ प्रदर्शित झाला होता. मात्र आता अभिनेता संजय दत्तच्या ‘मुन्ना भाई 3’ चित्रपटाची प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहत आहेत. या चित्रपटाबाबत अनेक बातम्या समोर येत असल्या तरी अजूनही हा चित्रपट तयार होईल की नाही याबाबत सस्पेंस आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Arshad Warsi (@arshad_warsi)

- Advertisement -

या चित्रपटात अभिनेता अरशद वारसीने सर्किट ही भूमिका साकारली होती. याचित्रपटाबाबत बोलताना अरशद वारसी म्हणाले की, “मुन्ना भाई एमबीबीएस चित्रपटाने माझ्या करिअरला दुसरे आयुष्य दिले होते, त्याच्या आधी माझ्याकडे 3-4 वर्ष कोणताही चित्रपट नव्हता. चाहत्यांच्या नजरेतून मी अलिप्त झालो होतो”.

 

View this post on Instagram

 

A post shared by Arshad Warsi (@arshad_warsi)

- Advertisement -

त्यानंतर ते म्हणाले की, “आम्ही लगे रहो मुन्ना भाई नंतर 16 वर्षापासून वाट पाहत आहोत. मात्र मला नाही वाटत ‘मुन्ना भाई 3’ चित्रपट येईल. पण असे झाले असते तर खूप बरं झाले असते. प्रेक्षकांनाही काहीतरी नवीन पाहायला मिळालं असते”.

संजय दत्तची प्रतिक्रिया
मात्र अभिनेता संजय दत्तने हा चित्रपट बनवण्यासाठी नकार दिलेला नाही. “संजय दत्तने एका इंटरव्यूमध्ये ‘मुन्ना भाई 3’ बनवण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करत आहोत. राजकुमार सुद्धा तो बनवू इच्छितात, त्यामुळे मला आशा आहे की, आम्ही याला लवकरचं पूर्ण करू शकू.”

 


हेही वाचा :Tejasswi Prakash करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण; Ayushmann Khurrana सोबत ‘या’ चित्रपटात झळकणार

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -