Saturday, July 24, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मनोरंजन अभिनेत्री आलिया भट्टने स्विकारलं चाळीस दिवसांचं फिटनेस चॅलेंज

अभिनेत्री आलिया भट्टने स्विकारलं चाळीस दिवसांचं फिटनेस चॅलेंज

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) बॉलिवूडमधील सर्वाधीक क्यूट ठरले आहेत. एकेकाळी आलियाने अनेकदा मुलाखती दरम्यान रणबीरवर क्रश असल्याचे म्हंटलं होतं आता दोघेही पार्टी,इंवेंट, वॅकेशन तसेच फॅमिली गेट टू गेदर एकत्र अटेंड करताना दिसतात. आलिया अनेकदा इंस्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून रणबीर कपूर सोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे संकेत दिले आहेत. आलियाची प्रत्येक पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होते. नुकतच आलिया 40 दिवसाचं फिटनेस चॅलेंज करत आहे. आलियाने एक सेल्फी पोस्ट शेअर करत लिहलं आहे की, “20 दिवस पुर्ण झाले आहे. आता फक्त 20 दिवस उरले आहेत.” फोटोमध्ये आलियाने निळ्या रंगाची स्पोट्स ब्रा आणि लेगिंग्ज घातली आहे. आपला चेहरा कवर करत आलियाने एक मिरर सेल्फी पोस्ट केली आहे.(Actress Alia Bhatt accepts 40 days fitness challenge)

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt ☀️ (@aliaabhatt)

- Advertisement -

आलियाच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी तसेच मलायका अरोरा,मनीष म्हलोत्रा,कतरीना कैफ सारख्या इतर कलाकारांनी कमेंट करत आलियाचे कौतूक केलं आहे. वर्क फ्रंट बाबतीत सांगायचे झाल्यास आलियाने नुकतच ‘गंगुबाई काठीयावाडी’ या सिनेमाचं शुटींग पुर्ण केलं आहे. तसेच रणबीर कपूर सोबत ती ‘ब्रम्हास्त्र’ या आगामी सिनेमात झळकणार आहे. ‘आरआरआर’ या बहुप्रतिक्षीत सिनेमामध्ये आलियाची वर्णी लागली आहे. इतकचं नाही तर आलियाने नुकतचं ‘रॉकी और राणी’ या चित्रपटात काम करणार असल्याची घोषणा केली आहे.


हे हि वाचा – ‘जय भवानी जय शिवाजी’ मालिकेत अभिनेता विशाल निकम दिसणार शिवा कशिदच्या भूमिकेत

- Advertisement -