Tuesday, April 20, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन अलिया भटच्या नव्या फोटोने चाहत्यांना केले क्लिनबोल्ड!

अलिया भटच्या नव्या फोटोने चाहत्यांना केले क्लिनबोल्ड!

आलियाने शेअर केलेल्या या फोटोला चाहत्यांची चांगलीच पसंती मिळत असून हा फोटो तिने शेअर करताच काही तासात १५ लाख लाईक्स मिळाले

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट जेव्हाही नव्या लूकमध्ये चाहत्यांसमोर येते तेव्हा तिचे चाहते मनसोक्त तिची तारीफ करतात. दरम्यान आलिया भटने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती ब्लॅक आऊटफीटमध्ये दिसत असून आलिया आपल्या केसातून हात फिरवताना दिसतेय. हा फोटो शेअर करताना आलिया भटने कॅज्युअली फ्लेक्सिंग असे कॅप्शन दिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt ☀️ (@aliaabhatt)

- Advertisement -

आलियाने शेअर केलेल्या या फोटोला चाहत्यांची चांगलीच पसंती मिळत असून हा फोटो तिने शेअर करताच काही तासात १५ लाख लाईक्स मिळाले आहेत. यासह चाहत्यांनी तिच्या या ब्लॅक आउटफिट असणाऱ्या फोटोला पसंती देत त्यावर कमेंट्स देखील केल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt ☀️ (@aliaabhatt)

- Advertisement -

आलिया भटच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर आलिया आगामी ब्रह्मास्त्र या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूर, अमिताभ बच्चन आणि मौनी रॉय देखील अभिनय करताना दिसणार आहे. या चित्रपटासह आलिया आरआरआर या चित्रपटात देखील चाहत्यांना दिसणार आहे. याशिवाय आलिया लवकरच संजय लीला भन्सालीच्या ‘गंगूबाई काठियावाड़’ चित्रपटात मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे.


लवकरच ‘मनमौजी’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला
- Advertisement -