घर मनोरंजन अभिनेत्री अमीषा पटेल पाकिस्तानी अभिनेत्याच्या प्रेमात?

अभिनेत्री अमीषा पटेल पाकिस्तानी अभिनेत्याच्या प्रेमात?

Subscribe

अमीषा आणि अब्बासचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. जो पाहून युजर्स ते दोघं एकमेकांना डेट करत असल्याचा अंदाज लावत आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री अमीषा पटेल सध्या तिच्या रिलेशनशिपमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. अमीषा पटेल पाकिस्तानी अभिनेता इमरान अब्बासला डेट करत असल्याच्या चर्चा सध्या फक्त भारताच नाही तर पाकिस्तानातही चर्चेत आल्या आहेत. अमीषा आणि अब्बासचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. जो पाहून युजर्स ते दोघं एकमेकांना डेट करत असल्याचा अंदाज लावत आहेत. मात्र या दोघांनी अजूनही याबाबत कोणताही खुलासा केला नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ameesha Patel (@ameeshapatel9)

पाकिस्तानी अभिनेता इमरान अब्बास नेहमी चर्चेत असतो. याचं कारण म्हणजे 2021 मध्ये एका वादग्रस्त वक्तव्यामुळे तो चर्चेत आला होता. याआधी सुद्धा इमरान अनेक सह-कलाकार अभिनेत्रींना डेट करत असल्याच्या चर्चा सुरू होत्या. 2021 मध्ये इमरानने सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांना त्याच्या अफेयर बद्दल सांगितलं होतं, त्यावेळी त्याने त्याच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिलं होतं की, अलीजेह शाह, सबूर, ऊषना आणि आता उर्वा 2021 मध्ये माझं तुम्ही चौथं लग्न करत आहात. या खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांविरोधात काय करवाई करता येईल? असी पोस्ट त्यावेळी इमरानने लिहिली होती.

- Advertisement -

‘गदर 2’ मध्ये दिसणीर अमीषा
15 जून 2021 मध्ये प्रदर्शित झालेल्या गदर चित्रपटाचा येत्या काळात दुसरा पार्ट येणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, यामध्ये सनी देओल आणि अमीषा पटेल दिसणार आहेत. काही दिवसांपूर्वी अमीषाने शूटिंग सेटवरील याचे काही फोटो शेअर केले होते.


बॉक्स ऑफिसवर ब्रह्मास्त्रच्या कमाईचा जोर ओसरला; 12 व्या दिवशी सर्वात कमी कमाई

- Advertisement -
- Advertisement -
shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -