मेगास्टार Mike Tysonने घेतला अनन्या पांडेच्या गालाचा चावा,पहा फोटो

actress ananya panday share photo with boxer mike tyson at liger movie set
मेगास्टार Mike Tysonने घेतला अनन्या पांडेच्या गालाचा चावा,पहा फोटो

अभिनेत्री अनन्या पांडे सध्या तिच्या बहुप्रतिक्षीत अशा लिगर या सिनेमाच्या सुटींगमध्ये व्यस्त आहे. अनन्या सध्या हॉलिवूड सुपरस्टार माइक टाइसनसोबत शुटींग करत आहे. याचदरम्यान त्यांचे काही फोटो समोर आले आहेत. ज्यात माइक टाइसन चक्क तिच्या तिच्या गालाचा चावा घेताना दिसत आहे. या फोटोंमध्ये माइक टाइसन अनन्याच्या अगदी जवळ उभा राहून तिच्या कानापाशी ओरडतो असल्याचे दिसत आहे. पण माइक अनन्याच्या गालाचा चावा घेतो की काय असं वाटत आहे.  अनन्या देखील या फोटोमध्ये मोठ्याने हसताना दिसत आहे. माइक टाइसन सोबतचा अनन्याचा फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.

अनन्याने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिने काळ्या कलरचा क्रॉप टॉप आणि जीन्स घातली आहे. काही तासात अनन्याच्या फोटोला ५ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

सिनेमाविषयी बोलायचे झाले तर सिनेमात  सिनेमात अनन्यासोबत साऊछ सुरस्टार विजय देवरकोंडा देखील प्रमुख भूमिकेत पहायला मिळणार आहे. करण जोहरचे प्रोडक्शन हाऊस आणि धर्मा प्रोडक्शनचा हा बिग बजेट सिनेमा असणार आहे. डॅशिंग डायरेक्टर पुरी जगन्नाथ यांनी सिनेमाचे डिरेक्शन केले आहे. सध्या अनन्या आणि विजय देवरकोंडा हे यूएसमध्ये सिनेमाचे शुटींग करत आहेत.

अनन्याच्या लिगर सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. अनन्याने ‘स्टुडंट ऑफ द इयर २’ या सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. ‘पति पत्नी और वो’, ‘खाली पीली’ या सिनेमातही अनन्या दिसली होती.


हेही वाचा – ‘योद्धा’मध्ये सिद्धार्थ मल्होत्राचा दमदार लुक